Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या

गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूरसह सांगलीला एमडी ड्रग्जची तस्करी करणार्‍या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 24, 2024 | 12:56 PM
ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या

ड्रग्ज तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; सांगलीतील हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूरसह सांगलीला एमडी ड्रग्जची तस्करी करणार्‍या रॅकेटचा शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला आहे. सांगलीतील एका हॉटेल व्यावसायिकाच्या पुत्रासह साथीदाराला बेड्या ठोकून त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीचा २९ ग्रॅम अमली पदार्थांचा साठा हस्तगत केला आहे. अथर्व संजय सरवदे (वय २४, रा. रतननगर रोड नं. १२, विश्रामबाग, सांगली) व संतोष काशीनाथ पुकळे (वय ३०, लक्ष्मीनगर, जुना कुपवाड रोड, शिवमंगल अपार्टमेंट प्लॉट नं. १, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

शाहू मार्केट यार्डातील वाळू अड्डा परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली आहे. संशयित सरवदे याने अमली पदार्थांचा साठा शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातून कोल्हापुरात आणला होता. संतोष पुकळे याच्यामार्फत या साठ्याची मार्केट यार्ड येथील वाळू अड्डा परिसरातून सांगलीकडे तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने रात्री उशिरा सापळा रचून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

संशयितांचे गोवा व कर्नाटक कनेक्शन

संशयितांनी पोलिसांचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने दोघांची अंगझडती घेताच अमली पदार्थाची दोन पाकिटे त्यांच्याकडे आढळली. चौकशीअंती जप्त साठा एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने चौकशीची व्याप्ती वाढविली. संशयितांचे गोवा व कर्नाटक कनेक्शन प्राथमिक चौकशीत समाेर आले आहे. साठा गोव्यातून कोणाकडून उपलब्ध झाला, याची माहिती घेण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा : मुलींचा घसरता जन्मदर चिंता वाढवणारा; केंद्रीय अहवालातून धक्कादायक वास्तव समाेर

कोल्हापूरसह सांगलीतील साथीदारांचा सहभाग

अमली पदार्थ तस्करीत अथर्व सरवदे याच्या कोल्हापूरसह सांगलीतील साथीदारांचा सहभाग असावा, असा संशय आहे. सरवदे हा सांगली (विश्रामबाग) येथील हॉटेल व्यावसायिकाचा पुत्र असल्याचेही पोलिसांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास शाहूपुरीचे तपास पथक सांगलीला जाणार असल्याचे ते म्हणाले.

अमली पदार्थांची तस्करी वाढली

देशात आता अमली पदार्थांचा साठा असो वा त्याची तस्करी हे सर्व वाढल्याचे दिसत आहे. त्यात काही महिन्यांपूर्वी पुण्यात ड्रग्ज तस्करी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच राजस्थानात मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता. मध्य प्रदेशात मोठी कारवाई करण्यात आली होती. राजधानी भोपाळमध्ये तब्बल 1800 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.

Web Title: Police have busted a drug smuggling racket and arrested two persons nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • kolhapur news
  • maharashtra

संबंधित बातम्या

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…
1

नसरापूरप्रकरणी मोठी अपडेट समोर; 7 वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवल्यानंतर आता…

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…
2

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन् क्षणातच…

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश
3

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई
4

महाळुंगे एमआयडीसीतून 81 सिलिंडरचा बेकायदा साठा जप्त; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.