Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भरदिवसा दरोडा, चोर उसाच्या शेतात लपले अन्…; पुरंदर तालुक्यातील सिनेस्टाईल थरार

पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक दौंडज येथे भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेलबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2025 | 12:10 PM
भरदिवसा दरोडा, चोर उसाच्या शेतात लपले अन्...; पुरंदर तालुक्यातील सिनेस्टाईल थरार

भरदिवसा दरोडा, चोर उसाच्या शेतात लपले अन्...; पुरंदर तालुक्यातील सिनेस्टाईल थरार

Follow Us
Close
Follow Us:

नीरा : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. चोरटे खरे फोडून लाखॆो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक दौंडज येथे भरदिवसा घरात दरोडा टाकून पळून चाललेल्या चोरांना ग्रामस्थ आणि पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून जेलबंद केले आहे. तर या दरम्यान चोरांना पकडण्यास गेलेल्या तरुणांना पिस्तूलचा धाक दाखवून पोबारा करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिन जणांना ताब्यात घेतले आहे.

शनिवारी दुपारी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या दौंडज गावामध्ये एका वस्तीवर दरोडा टाकून तीन चोरांनी पोबारा केला होता. मात्र स्थानिक तरुणांनी त्यांच्या पाठलाग सुरु केला. नीरा नजीक थोपटेवाडी रेल्वे गेट बंद असल्याने चोरांची अडचण झाली. त्यांना थांबावं लागले. यादरम्यान दौंडजपासून चोरांचा पाठलाग करत आलेल्या तरुणांनी चोरांना पकडले. मात्र या तरुणांना पिस्तूलचा घाक दाखवून यातील दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर वाहन चालकाला त्यांनी पकडून ठेवले. दरम्यान याबाबतची माहिती जेजुरी पोलिसांना मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे त्याचबरोबर पीएसआय सर्जेराव पुजारी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळाकडे धाव घेतली. पुणे पंढरपूर मार्ग ते जेऊर यादरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपून बसले होते. यावेळी जेऊर, पिसुर्डी, पिंपरे, नीरा या गावातील दीडशे ते दोनशे तरुण त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण शेतीला वेढा घालून उभे राहिले. त्यामुळे चोरांना पळून जाणे शक्य झाले नाही.

दरम्यान पोलिसांनी ड्रोन आणले. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शेतीचा सर्वे करण्यात आला. उसाचे क्षेत्र असल्याने पोलिसांना चोरांना शोधणे अवघड होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे पिस्तूल असल्यामुळे कोणताही धोका न घेता पोलिसांनी तरुणांना फक्त राखण करा. कोणीही उसाच्या शेतामध्ये जाऊ नये असे निर्देश दिले होते. ड्रोनच्या कॅमेऱ्यामध्ये हे चोर ऊसाच्या शेतामध्ये असल्याचे दिसून आले. यानंतर पोलीस आणि तरुणांनी जाऊन या चोरांच्या मुसक्या आवळल्या. जेजुरी पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे अधिकचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांनी माध्यमांना दिली आहे. चोरांना पकडण्यासाठी पोलिस टीममध्ये संदीप मदने, केशव जगताप, संदीप भापकर विठ्ठल कदम, दशरथ बनसोडे, रविराज कोकरे, घनश्याम चव्हाण,प्रसाद कोळेकर, आदींनी सहभाग घेताला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

“जेजुरी पोलीस स्टेशनचे टीम चोरांना पकडण्यास गेली असताना स्थानिक तरुणांनी देखील चांगलं सहकार्य केलं. तरुणांच्या सहकार्यामुळे चोरांना पळून जाता आले नाही. पोलीस टीममधील कर्मचाऱ्यांनी देखील तत्परता दाखवली आणि त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करणे शक्य झाले. लोकांचे सहकार्य लाभले तर अशा प्रकारच्या चोरांचा बंदोबस्त करणे सहज शक्य आहे तर लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो.”

– दीपक वाकचौरे ( प्रभारी अधिकारी, जेजुरी पोलिस स्टेशन)

Web Title: Police have caught thieves who robbed in broad daylight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2025 | 12:10 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

धक्कादायक ! मुलाच्या हव्यासापोटी दोन महिन्यांच्या मुलीची हत्या; जन्मदात्या आईचे कृत्य
1

धक्कादायक ! मुलाच्या हव्यासापोटी दोन महिन्यांच्या मुलीची हत्या; जन्मदात्या आईचे कृत्य

Extra Marital Affair: आईवर चढली अशी प्रेमाची नशा की 2 वर्षाच्या मुलीचीच केली हत्या, गावाच्या बाहेरील नालीत…
2

Extra Marital Affair: आईवर चढली अशी प्रेमाची नशा की 2 वर्षाच्या मुलीचीच केली हत्या, गावाच्या बाहेरील नालीत…

Pune Crime: एवढी मस्ती! अंडाभुर्जीची गाडी चालविणार्‍यांची महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी; दोघांवर थेट…
3

Pune Crime: एवढी मस्ती! अंडाभुर्जीची गाडी चालविणार्‍यांची महिला पोलिस अधिकार्‍याला धमकी; दोघांवर थेट…

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण…
4

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला, डोक्यात सपासप वार; कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.