Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परंडा दगडफेक प्रकरणी मोठी अपडेट; तानाजी सावंतांच्या कट्टर समर्थकासह 24 जणांवर गुन्हा दाखल

परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकेर सौदागर यांच्यासह २४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 20, 2025 | 04:33 PM
परंडा दगडफेक प्रकरणी मोठी अपडेट; तानाजी सावंतांच्या कट्टर समर्थकासह 24 जणांवर गुन्हा दाखल

परंडा दगडफेक प्रकरणी मोठी अपडेट; तानाजी सावंतांच्या कट्टर समर्थकासह 24 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • परंडा दगडफेक प्रकरणी मोठी अपडेट
  • तब्बल 24 जणांवर केली कारवाई
  • आचारसंहिता भंगाचा गुन्हा केला दाखल
धाराशिव : तहसील कार्यालयाच्या आवारात दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकेर सौदागर यांच्यासह २४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जाकेर सौदागर हे माजी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

मंगळवारी (१८ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजताच्या सुमारास परंडा नगरपालिकेत नामनिर्देशन पत्र छाननीच्या ठिकाणी व कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आचारसंहितेचे उल्लघन करुन निवडणुक कामकाजावेळी गोंधळ निर्माण करुन दगडफेक करुन शासकीय मालमत्तेस, स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका निर्माण केला व जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लघंन केले. आशा आशयाची तक्रार नगर अभियंता राहुल बंडु रणदिवे यांनी बुधवारी (१९ नोव्हेंबर) परंडा पोलिसात दिली आहे. त्यावरून गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांची नावे

जाकीर ईस्माईल सौदागर, कैफ आब्दुल सौदागर, मोसीन जाकीर सौदागर, उबेद वाहेद आत्तार, रहिमान सौदागर, औरब वाहेद सौदागर, फाजील ईस्माईल सौदागर, गबु ईस्माईल सौदागर, वाहेद ईस्माईल सौदागर, सोनु आत्तार रहिमान सौदागर शर्फराज महंमद शरिफ कुरेशी, शेरु ईस्माईल सौदागर, नसीम अहमद पठाण, शफी अहमद पठाण, इरफान जब्बार शेख, मुनाफ सौदागर, ईफु निसार सौदागर, नुतलिब आब्दुल सत्तार कुरेशी, ईस्माईल सत्तार कुरेशी, मोसीन दस्तगीर कुरेशी, सम्मद अब्दुल सत्तार कुरेशी, रफीक कुरेशी, ईरशाद आलीशान कुरेशी, बिलाल खुद्रुस कुरेशी, अलिशान कुरेशी (सर्व रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव).

छाननीवेळी झालेल्या बाचाबाचीतून उडाला गोंधळ

मंगळवारी उमेदवारी छाननीदिवशी तीन अपत्य असल्याची हरकत जाकेर सौदागर यांनी प्रभाग तीनमधील अन्य उमेदवाराच्या अर्जावर घेतली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ही हरकत फेटाळून लावली. त्यावर विरोधकांनी टाळ्यांचा गजर केला. यानंतर सभागृहाबाहेर येताच दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान दगडफेकीत झाले. परंडा शहरात तणाव वाढला होता. मात्र पोलीस आणि प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवत परिस्थिती सामान्य केली.

Web Title: Police have registered a case against 24 people including a staunch supporter of tanaji sawant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • crime news
  • Dharashiv Crime
  • Tanaji Sawant

संबंधित बातम्या

Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू
1

Tamhini घाटात अपघाताचा थरार! तीव्र वळणावर तोल गेला अन् थेट 500 फूट…; 6 जणांचा मृत्यू

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना
2

पुण्यात हिट अँड रनमध्ये सात वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; बालेवाडीतील धक्कादायक घटना

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
3

पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?
4

कोयत्याच्या धाकाने दरोडा, कॅमेऱ्यात थरार कैद; रात्री नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.