Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का कारवाई; नेमकं प्रकरण काय?

माजी नगरसेवक किसन तापकीरसह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2025 | 11:33 AM
फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का कारवाई; नेमकं प्रकरण काय?

फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • फरार माजी नगरसेवक किसन तापकीरवर मोक्का
  • व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून केला होता खून
  • विक्रांत देवकुळे टोळीवरही मोक्काची कारवाई
पिंपरी : चऱ्होली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून खून केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन तापकीरसह सहा जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या टोळीसह चिखली मधील अनिरुद्ध जाधव, एमआयडीसी भोसरी मधील राहुल लोहार, दिघीमधील विक्रांत देवकुळे या टोळ्यांवर देखील मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चालू वर्षात ३५ गुन्हेगारी टोळ्यांमधील १७९ गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई केली आहे.

आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली. तर सातवा साथीदार माजी नगरसेवक किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर हा फरार आहे. तोच या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे. दिघी पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या सात जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, यातील आरोपींवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळीप्रमुख अमित जीवन पठारे (३३, चऱ्होली बुद्रुक), विक्रांत सुरेश ठाकूर (३८, सोळू, खेड), सुमित फुलचंद पटेल (३१, दिघी), आकाश सोमनाथ पाठारे (२३, चऱ्होली बुद्रुक), सोमनाथ प्रकाश पाटोळे (२४, सोळू, खेड), किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर (चऱ्होली बुद्रुक) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

दिघी पोलिसांनी आणखी एका टोळीवर मोक्काचा प्रस्ताव पाठवला. टोळीप्रमुख विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे (वय २४), सुरज राजू चव्हाण (वय २०), साहिल उर्फ विश्वास मुकेश लोट (वय १९), शुभम सुमित डिंगीया (वय २४, सर्व रा. बोपखेल) या टोळीवर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. दिघी पोलिसांनी मोक्काचा पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, विक्रांत देवकुळे टोळीवर देखील कारवाई झाली आहे.

चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव याच्या टोळीवर देखील मोक्का लावण्यात आला आहे. टोळीप्रमुख विकी जाधव याच्यासह सोहन राजू चंदेलिया (२३, रावेत), प्रद्युमन राजकुमार जवळगे (२५, चाकण), यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे (२१, निगडी), अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार (२२, चिंचवड), शुभम गोरखनाथ चव्हाण (३०, आकुर्डी), अनिकेत अशोक बाराथे (२७, दापोडी), अश्विन सुधीर गायकवाड (२१, दापोडी), यशपालसिंग अरविंद सिंग देवडा (१९, सांगवी) आणि पाच अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई झाली आहे. या टोळीतील सदस्यांवर तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

एमआयडीसी भोसरी परिसरातील सराईत गुन्हेगार टोळीप्रमुख राहुल अप्पासाहेब लोहार (२७, उरुळी कांचन), टोळीतील सदस्य हृतिक प्रकाश गायकवाड (२४, चाकण), आकाश दिनकर गायकवाड (२४, मोशी), गणेश बबन वहिले (२३, डुडुळगाव, पुणे), शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे (२४, डुडुळगाव) यांच्या विरोधात १० गंभीर गुन्हे दाखल आहेत, या टोळीवर देखील मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

मोक्काची कारवाई झालेल्या चार टोळ्यांमधील आरोपींवर चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहूरोड, एमआयडीसी भोसरी, दिघी, हिंजवडी, दिघी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकी, कोंढवा, उत्तमनगर पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, अमली पदार्थ विक्री करणे, चोरी, अपहरण, शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

 

Web Title: Police have taken major action against absconding former corporator kisan tapkir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

अमरावतीत मोठा घोटाळा; तारण म्हणून ठेवलेला माल परस्परच विकला, तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक
1

अमरावतीत मोठा घोटाळा; तारण म्हणून ठेवलेला माल परस्परच विकला, तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…
2

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

मोठी बातमी! चिपळूणच्या उद्योजकाचा दहशतवाद्यांशी संबंध? ED चे पथक 24 तास ठाण मांडून, चौकशी होणार
3

मोठी बातमी! चिपळूणच्या उद्योजकाचा दहशतवाद्यांशी संबंध? ED चे पथक 24 तास ठाण मांडून, चौकशी होणार

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष
4

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.