Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना ठोकल्या बेड्या

कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास एक मोठी धाडसी कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 11:45 AM
बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना ठोकल्या बेड्या

बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चौघांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी
  • चौघांना ठोकल्या बेड्या
  • कस्टम विभागाची मोठी कारवाई
रत्नागिरी : कोल्हापूर शहरानजीकच्या महामार्गावर कस्टम विभागाने (सीमा शुल्क विभाग) रविवारी पहाटेच्या सुमारास एक मोठी धाडसी कारवाई केली आहे. बिबट्याच्या कातड्यांची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत विभागाने दोन मौल्यवान कातडी आणि एक आलिशान कार जप्त केली आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

 

काही व्यक्ती बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीरपणे वाहतूक करून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाच्या प्रतिबंधक व गुप्तचर शाखेला मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत अधीक्षक हिमांशु शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या कारवाईत अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर, संदीप कौशिक यांच्यासह निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा आणि हवालदार संजय जाधव व अभिषेक यादव यांचा सहभाग होता. रत्नागिरी विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप कृष्णा यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, वन्यजीव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

पथकाने रविवारी (दि. २९ मार्च) पहाटेच्या सुमारास कोल्हापूर महामार्गावर सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणारी एक मॅरून रंगाची किया सेल्टोस गाडी अडवून तिची कसून झडती घेतली असता, त्यात दोन बिबट्यांची कातडी लपवून ठेवल्याचे उघड झाले. सीमा शुल्क विभागाने ही कातडी आणि तस्करीसाठी वापरलेली गाडी जप्त केली असून, घटनास्थळावरून काही आक्षेपार्ह कागदपत्रे व इलेक्ट्रॉनिक उपकरणेही ताब्यात घेतली आहेत.

हे सुद्धा वाचा : प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली

विविध जिल्ह्यांतील रहिवासी

या कारवाईत अटक करण्यात आलेले चार आरोपी विविध जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. त्यापैकी दोन आरोपी कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील असून, इतर दोन जण सातारा आणि लातूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा : नालासोपाऱ्यात धक्कादायक घटना! पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह; टॅटूमुळे ओळख पटली

Web Title: Police have taken major action by arresting those involved in illegal smuggling of leopard skins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Leopard

संबंधित बातम्या

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
1

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
3

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
4

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.