Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

२० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 30, 2025 | 02:54 PM
20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

20 हजारांची लाच घेणं भोवलं; सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी तक्रारदारांकडून तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच घेताना लोणावळा शहर पोलिस ठाण्यात सहाय्यक उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. शकील मोहम्मद शेख ‌(वय ४५, रा. लोणावळा) असे पकडलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शकील शेख पुणे ग्रामीण पोलीस दलात कर्तव्यास आहेत. ते लोणावळा शहर पोलिस ठाण्याअंतर्गत नारायणीधाम पोलिस चौकीत कर्तव्य बजावतात. दरम्यान, ४२ वर्षीय तक्रारदार यांच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास शकील शेख हे करत आहेत. दरम्यान, तक्रारदारांना दाखल गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी शकील शेख यांनी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानूसार, सोमवारी सापळा कारवाईत शेख यांना तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली आहे.

हे सुद्धा वाचा : आयुष कोमकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट! आंदेकर टोळीबाबत न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत

गेल्या काही महिन्याखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे. दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल ३०६ अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी लाचेची मागणी केली होती. २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी नंतर ९५ हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले होते. मात्र, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली. एसीबीने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व एका महिला अंमलदार लोखंडे यांना ताब्यात घेतले.

Web Title: Police officer caught taking bribe at lonavala police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • Bribe Case
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…
1

खळबळजनक ! मुख्याध्यापिका ओरडल्या म्हणून दोन विद्यार्थ्यांनी थेट हत्याच केली; हत्येनंतर गोव्याला जाऊन पार्टी अन्…

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले
2

निवृत्त बँक मॅनेजरला 14 लाखांचा गंडा; दररोज पाच टक्के नफ्याचे आमिष नडले

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
3

Pune Crime : खुनाच्या प्रयत्नातील आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…
4

नागपुरात 28 वर्षीय तरुणीची हत्या; दागिन्यांच्या पेटीत शस्त्र, लाल साड्या, फुग्यांची सजावट अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.