crime (फोटो सौजन्य: social media)
सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती मातांना आमिष दाखवून खासगी रुग्णलयात पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. या बदल्यात रुग्णालयाकडून आशा सेविकांना कमिशन, भेटवस्तू, महागड्या हॉटेलमध्ये जेवण अश्या गोष्टींचे आमिष दिली जात असल्याचं समोर आलं आहे.
पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केली तरुणाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन्…
चौकशीत काय निष्पन्न
चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, रुग्णांच्या उपचारात झालेल्या एकूण बिलाच्या रकमेपैकी २५ टक्के रक्कम ही कमिशन म्हणून आशा सेविकांना दिली जात होती. केवळ कमिशनच नाही तर भेटवस्तू, महागड्या हॉटेलमध्ये जेवण अश्या अनेक गोष्टींचा आमिष दाखवून आशा सेविकांना असे करण्यास प्रवृत्त केले जात होते.
हा सर्व प्रकार श्रेयस नर्सिंग होम हॉस्पिटलकडून करण्यात येत होते. शासकीय आरोग्य सेवेऐवजी खासगी रुग्णालयात जाण्यासाठी आशा सेविका गर्भवती महिलांची दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रेयस नर्सिंग होमने आशा सेविकांना संपर्क साधण्यासाठी एक व्हॉट्सअॅपचा ग्रुप तयार केला होता. याच ग्रुपच्या माध्यमातून आशा सेविकांना विविध प्रकारचे अमिश दाखवले जात होते असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी महापालिकेने गंभीर दाखल घेतली आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील असलेल्या आशा सेविका आणि श्रेयस नर्सिंग होमच्या डॉक्टरांना देखील महापालिकेने नोटीस पाठवली आहे. कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा मागितला महापालिकेने आहे. यावर लवकरच योग्य ती कारवाई होण्याची शक्यता आहे.
भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; तुळजापूर येथून टोळीला अटक
पुण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कात्रज परिसरातून दोन वर्षाच्या चिमुरडीचा अपहरण करून तिला भीक मागायला लावणार असल्याचे धक्कदायक माहिती समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथून चिमुरडीची सुखरूप सुटका करत टोळीतील पाच जणांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
फिर्यादी धनसिंग हनुमंत काळे (वय २५) हे आपल्या कुटुंबासह कात्रजमधील वंडर सिटी परिसरातील झोपडी वजा घरात वास्तव्यास आहेत. त्यांना चार अपत्य असून त्यातील दोन वर्षाच्या जुळ्या मुली आहेत. २५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास संपूर्ण कुटुंब झोपेत असतांना, चिमुरडीला झोपाळ्यातून उचलून नेण्यात आले. मध्यरात्री जाग आल्यावर ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक मदत व सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपींना शोधून तुळजापूर येथून अटक केली आहे.
Thane News: पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्स तस्करी करणाऱ्या दोघांना अटक