पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केली तरुणाची हत्या; चाकूने सपासप वार केले अन्... (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या (Crime) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडत आहेत. असे असताना आता नागपुरातच पूर्ववैमनस्यातून चार आरोपींनी एका तरुणाची चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केली. हर्षल अनिल सौदागर (वय 26, रा. लाल शाळेजवळ, लकडगंज) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे.
प्रज्ज्वल उर्फ फारूख नामदेव कानारकर (वय 24, रा. गंगाबाग पारडी), प्रज्ज्वल उर्फ पज्जू सुधाकर डोरले (वय 24, रा. नवाबपुरा-कोतवाली), वैभव हिरामण हेडाऊ (वय 28) आणि राहुल उर्फ दद्या दशरथ शेटे (वय 33, दोन्ही रा. गुजरी चौक, जुनी मंगळवारी, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime : लग्नाचे आमिष देऊन ७ महिने केलं लैंगिक छळ, बळजबरीने गर्भपात केलं आणि…; नवी मुंबईतील घटनेने खळबळ
हर्षल आणि मुख्य आरोपी वैभव हे बालपणाचे मित्र होते. मृतक हर्षल हा हफ्ते थकले की दुचाकी वाहन जमा करण्याचे काम करायचा. तर आरोपी वैभव हा एका फायनान्स कंपनीत वाहन खरेदीसाठी फायनान्सचे काम करतो. त्याचा साथीदार प्रज्ज्वल कानारकर हा मार्केटिंगचे तर प्रज्ज्वल डोरले हा घोड्यांचा व्यवसाय करतो.
तरुणाचा मृत्यू, चार आरोपींना केली अटक
लोनवर घेतलेल्या वाहनाचे हप्ते थकले की, हर्षल वाहन उचलून कंपनीत जमा करायचा. दीड महिन्यापूर्वी एक वाहन जप्त केल्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. रविवारी रात्री सुमारास चारही आरोपी जुनी मंगळवारीच्या गुजरी चौकात बसून दारू पित होते. या दरम्यान हर्षल आला आणि त्यांच्यापासून काही अंतरावर त्याने ब्रेक लावला. नंतर येऊन त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या दोघांमध्ये वाद इतका टोकाला गेला की त्याने चाकू काढून हर्षल याच्यावर हल्ला चढवला. यामध्ये हर्षलचा मृत्यू झाला.
हेदेखील वाचा : Pune Crime News: भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; तुळजापूर येथून टोळीला अटक