Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jail Overflow: राज्यातील तुरुंग ‘ओव्हरफ्लो’! ४१ हजार कैदी अन् जागा फक्त २७ हजारांची

राज्यात मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, विशेष कारागृह, किशोर सुधारालय, मुंबई जिल्हा महिला कारागृह, खुले कारागृह आणि खुली वसाहत असे एकूण ६० कारागृह आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 03, 2026 | 04:55 PM
Maharashtra Prison Overcrowding, Central Jail Maharashtra Report, Home Department Budget 2026,

Maharashtra Prison Overcrowding, Central Jail Maharashtra Report, Home Department Budget 2026,

Follow Us
Close
Follow Us:
  • महाराष्ट्र राज्यातील ६० कारागृहांची अधिकृत क्षमता २७,१८४ असताना, ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत तिथे प्रत्यक्षात ४१,६३० कैदी
  • राज्यातील कारागृहांमध्ये १५५३ महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे, मात्र प्रत्यक्षात १,८८० महिला बंदीवासात
  • क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त कैदी ठेवल्यामुळे कारागृहांची स्थिती एखाद्या ‘कोंडवाड्या’सारखी
Maharashtra Prison Overcrowding:  राज्यात असलेल्या मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह वर्ग एक, दोन, तीन अशा प्रकारच्या सर्व कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याच्या एकूण उपलब्ध क्षमतेपेक्षा (उपलब्ध क्षमता २७१८४) तब्बल १४ हजार ४४६ जास्त कैदी बंदीवासात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कैद्यांनी ओव्हरफ्लो झालेल्या राज्यातील कारागृहांचा प्रवास कोंडवाड्यांकडे सुरू आहे की काय अशी शंका वर्तवली जात आहे.

Ashok Kharat Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त

राज्यात मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह, विशेष कारागृह, किशोर सुधारालय, मुंबई जिल्हा महिला कारागृह, खुले कारागृह आणि खुली वसाहत असे एकूण ६० कारागृह आहेत. सन २०२६/२७ गृह विभाग कार्यक्रम अंदाजपत्रक भाग ५ (तुरुंग ) मधील उपलब्ध माहितीनुसार या सर्व कारागृहांत बंदी ठेवण्याची एकूण अधिकृत क्षमता २७,१८४ इतकी असताना ३१ मार्च २०२५ अखेरपर्यंत या सर्व कारागृहांमध्ये ४१,६३० कैदी ठेवण्यात आले होते. याचाच अर्थ कारागृहांच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा या कारागृहांमध्ये तब्बल १४ हजार ४४६ कैदी बंदीवासात अधिकचे ठेवण्यात आले होते. सर्व कारागृहात मिळून एकूण अधिकृत महिला बंदी ठेवण्याची क्षमता १ हजार ५५३ इतकी होती. मात्र प्रत्यक्षात या सर्व कारागृहात मिळून १ हजार ८८० महिला बंदी होत्या.

 

– कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन

राज्यातील नऊ मध्यवर्ती कारागृह, जिल्हा कारागृह वर्ग एक ची १६ कारागृहे, जिल्हा कारागृह वर्ग दोन ची १८ कारागृहे, जिल्हा कारागृह तीनची १७ कारागृहे अशा एकूण ६० कारागृहांचा आढावा घेतला असता या सर्व कारागृहांमध्ये बंदी ठेवण्याच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बंदी ठेवण्यात आल्याचे दिसून येते. या सर्व कारागृहामध्ये मिळून २७१८४ इतकी चंदी क्षमता होती, परंतु ३१ मार्च २०२५ पर्यंत या सर्व कारागृहात ४१ हजार ६३० बंदी होते. याचाच अर्थ १४ हजार ४४६ बंदी हे अतिरिक्त कोबले गेले होते. एकूणच राज्यातील कारागृहांची स्थिती कोंडवाड्यासारखी झाली आहे. उपलब्ध क्षमतेपेक्षा कारागृहांमध्ये अधिकचे कैदी ठेवणे म्हणजेच कैद्यांच्या मानवी हक्कांचे उल्लघन असल्याचे जाणकाराचे मत आहे. तर दुसरीकडे कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या वाढावी है राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याकडे अंगुली निर्देश करणारे आहे.

Ashok Kharat Case: ओश्नोजल’मधून गर्भपाताच्या गोळ्या! अशोक खरातच्या क्रूरतेचा नवा पुरावा समोर

महाराष्ट्र कारागृहांची आकडेवारी
एकूण कारागृहे: ६०
अधिकृत क्षमता: २७,१८४ कैदी
सर्व कारागृहांतील एकूण कैदी (वास्तविक संख्या): ४१,६३०

१. क्षमतेपेक्षा जास्त कैदी: या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कारागृहांची अधिकृत क्षमता २७,१८४ असली, तरी तिथे प्रत्यक्षात ४१,६३० कैदी आहेत. याचाच अर्थ कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा सुमारे ५३% जास्त कैदी राहत आहेत.

२. नवीन कारागृहांची गरज: कैद्यांची वाढती संख्या आणि कारागृहांची अपुरी पडणारी जागा पाहता, राज्य सरकारने नवीन कारागृहे उभारण्याचे नियोजन केले आहे. ताज्या बातम्यांनुसार, राज्यात आणखी १४ नवीन कारागृहे उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

३. येरवडा कारागृह: पुण्याचे येरवडा मध्यवर्ती कारागृह हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि दक्षिण आशियातील मोठ्या कारागृहांपैकी एक मानले जाते.

४. सुरक्षा आणि सुधारणा: कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन पोलीस भरतीवर (उदा. कारागृह शिपाई भरती) भर दिला जात आहे.

 

 

Web Title: Prisons or cramped shelters 41630 prisoners packed in space meant for 27184

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Breaking News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.