Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Section 144: पुणेकरांसाठी मोठी बातमी! आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू! ८ जूनपर्यंत कडक निर्बंध

Pune Section 144 imposed 2026: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जमाव, निदर्शने किंवा गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 11:46 AM
Pune News, Section 144, Pune Police, PMC Update, Car Pooling,

Pune News, Section 144, Pune Police, PMC Update, Car Pooling,

Follow Us
Follow Us:
  • आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू
  • पुढील १४ दिवसांसाठी म्हणजेच ८ जून २०२६ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत
  • सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी
Section 144 Imposed In Pune From Tonight: पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज (26 मे) रात्रीपासून पुण्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने परिपत्रक जारी केले असून पुढील १५ दिवस हा जमावबंदीचा आदेश लागू असणार आहे. या जमावबंदीच्या काळात पाच जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय जमावबंदीच्या काळात आंदोलने मोर्चे आणि सभांनाही बंदी घालण्यात आले आहे.

पुणे शहर पोलिसांनी यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने आज रात्रीपासून, म्हणजेच २६ मे २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. हे आदेश ८ जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहेत.

Pune Floods: पहिल्याच पावसात पुणे तुंबले; हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला? प्रमोद भानगिरेंचा थेट सवाल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात विविध संघटना आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी बकरी ईद आणि इतर सणांच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. संभाव्य आंदोलन, निदर्शने किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान पुणे महापालिका प्रशासनानेही इंधन खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘कार पुलिंग’ सक्तीचे करण्यात आले असून, शक्य त्या बैठका ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंधन बचत आणि प्रशासकीय खर्च कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक

कशी असेल जमावबंदी?

पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, पुढील १४ दिवसांत खालील गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, सभा, आंदोलने, निदर्शने करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास सक्त मनाई करण्यात आली

कोणालाही तलवार, भाला, काठी, लाठी, बंदूक किंवा शरीराला इजा पोहचेल अशी प्रकारची कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगता येणार नाही.

कोणतेही ज्वलनशील द्रव पदार्थ, स्फोटके, दाहक घटक सार्वजनिक ठिकामी सोबत नेण्यावर बंदी निर्बंध असतील

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या घोषणा देणे, चिथावणीखोर वक्तव्ये, वाद्य वाजवणे, यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल.

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल होणार

पुणे शहर पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जमाव, निदर्शने किंवा गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Purandar Airport : मोबदल्याची घाई अन् नोंदींची धावपळ; पुरंदर विमानतळ प्रकल्पगस्त शेतकरी व्यस्त

पुणे महापालिकेचे इंधन बचतीसाठी कडक आदेश

एकीकडे शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असताना, दुसरीकडे पुणे महापालिकेने वाढता आर्थिक भार आणि इंधन खर्च नियंत्रणात आणण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कडक नियमावली लागू केली आहे.

महापालिकेच्या आदेशानुसार, एकाच ठिकाणी जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी स्वतंत्र वाहनांचा वापर टाळून ‘कार पुलिंग’ पद्धतीचा अवलंब करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, मंत्रालय, उच्च न्यायालय किंवा इतर कार्यालयीन कामांसाठी प्रवास करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एसटी बस, रेल्वे, मेट्रो किंवा लोकलसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करावा लागणार आहे. आठवड्यातून किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Web Title: Section 144 imposed in pune from tonight gatherings of 5 or more people banned until june 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • Breaking News
  • Law And Order
  • pune news
  • Pune Police
  • Section 144

संबंधित बातम्या

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा
1

प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

नेहमीची डिलिव्हरी ठरली हृदयस्पर्शी अनुभव: पुण्यातील ग्राहकाने स्विगीच्या महिला डिलिव्हरी पार्टनरला दिली ₹1,000 ची टिप
2

नेहमीची डिलिव्हरी ठरली हृदयस्पर्शी अनुभव: पुण्यातील ग्राहकाने स्विगीच्या महिला डिलिव्हरी पार्टनरला दिली ₹1,000 ची टिप

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर; इमारतीतील बचावकार्य संपलं, एक जण कचऱ्याखाली बेपत्ता
3

Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर; इमारतीतील बचावकार्य संपलं, एक जण कचऱ्याखाली बेपत्ता

‘तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का?’ मोशी दुर्घटनेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा, 64 तास उलटूनही बचावकार्य सुरूच !
4

‘तर तुमच्या तंत्रज्ञानाला काय चाटायचं का?’ मोशी दुर्घटनेवरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा, 64 तास उलटूनही बचावकार्य सुरूच !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.