Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राहत्या घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; 1000 रुपये घेऊन महिलेकडे पाठवलं अन्…

डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेश्यागमनासाठी होकार दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 21, 2025 | 03:04 PM
राहत्या घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; 1000 रुपये घेऊन महिलेकडे पाठवलं अन्...

राहत्या घरातच सुरु होता वेश्याव्यवसाय; 1000 रुपये घेऊन महिलेकडे पाठवलं अन्...

Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीड शहरातील पालवन चौकात वेश्याव्यवसायावर पोलिस पथकाने छापा टाकला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कारवाई, पीडित महिलेची सुटका, वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनैतिक वाहतूक प्रतिबंध कक्ष बीडच्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्दीत पालवण रोड ला, पालवण चौक जवळ, एक महिला एका पुरुषाच्या मदतीने आपल्या राहत्या घरामध्ये महिलांना बाहेरुन बोलावून वेश्या व्यवसाय करत आहेत.

हेदेखील वाचा : Nylon Manja Action Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त; गुन्हे शाखेची शहरात मोठी छापेमारी

याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यावरून वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सदर ठिकाणी छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक कस्तुरे व अ. मा. वा. प्र. कक्षाच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव या त्यांच्या संपूर्ण स्टाफसह तसेच डमी ग्राहक व पंचासह सापळापूर्व पंचनामा करून सदर ठिकाणी गेले. डमी ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खात्री केली असता तेथे असलेल्या पुरुष एजंटने वेश्यागमनासाठी होकार देऊन त्यासाठी १००० रुपयांची मागणी केली व डमी ग्राहकास वरच्या मजल्याच्या रूममधे जायला सांगितले.

दरम्यान, डमी ग्राहकाने ठरल्याप्रमाणे रक्कम देऊन पोलीस पथकास ठरलेला इशारा केला असता, पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा मारला. पैसे स्वीकारलेल्या पुरुषास त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ज्ञानोबा गदळे (वय ६१, रा. मादळमोही ता. गेवराई जि. बीड) असे सांगितले.

आरोपीची दोन पंचासमक्ष घेतली झडती

आरोपी अशोक गदळेची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे डमी ग्राहकाने दिलेल्या २ नोटा मिळून आल्या. तसेच रुमची झडती घेतली असता १२ विना वापरलेले निरोध मिळून आले आहे. दोन्ही नमूद आरोपींवर पीडित महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बोलावून घेऊन, स्वतःच्या ताब्यातील जागेचा वापर करुन त्याच कमाईवर उदरनिर्वाह करुन वेश्याव्यवसाय करण्यास लावले.

सदर पुरुषाची झडती घेतली असता डमी ग्राहकाने दिलेल्या नमूद वर्णनाच्या ५०० रूपयांच्या २ नोटा मिळून आल्याने त्या पंचासमक्ष जप्त केल्या. सदर ठिकाणी एक पीडित महिला मिळून आली. पीडित महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने सांगितले की, अशोक ज्ञानोबा गदळे आणि आशा सुंदर पवार (वय ४५ रा. पालवण रोड पालवण चौक जवळ जि. बीड) हे दोघे महिलांना घरी बोलवून घेतात व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेऊन पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे सांगितले.

Web Title: Prostitution was being carried out in the residential house itself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Beed News
  • crime news
  • Prostitution Case

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले
1

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता होण्याचे वाढतंय प्रमाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण
2

अल्पवयीन मुले-मुली अचानक बेपत्ता होण्याचे वाढतंय प्रमाण; पालकांमध्ये भीतीचे वातावरण

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…
3

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ; न कळत तरुणीचे फोटो काढले अन्…

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई
4

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.