संभाजीनगर हादरलं! २ लाखाहून अधिक किमतीचा नायलॉन मांजा जप्त (Photo Credit- X)
पोलिसांची ‘धडक’ कारवाई
सातारा परिसर आणि पुंडलिकनगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर येथील संकेत दीपक कानडे (२६) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीनंतर सातारा परिसरातील गोदामातून १४४ चक्री जप्त करण्यात आल्या. याच परिसरातून गोविंद साळुंके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ९७ चक्री जप्त केल्या. पोलिसांच्या भीतीने नायलॉन मांजा नष्ट करण्यासाठी गेलेल्या तुषार काथार याला पोलिसांनी राजीव गांधी स्टेडियम परिसरातून ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ४८ चक्री जप्त केल्या.
भोईवाड्यात क्रांती चौक पोलिसांची मोठी कारवाई
भोईवाडा परिसरात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर क्रांती चौक पोलिसांनी १९ डिसेंबर रोजी दुपारी छापा टाकला. या कारवाईत केतन श्रीधर मोहिते, ऋषिकेश विठ्ठल पडोळ आणि सुरज जिनकर चरखे या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार भावसिंग चव्हाण यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांचा कडक इशारा
पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले की, संक्रांतीपर्यंत ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. शहरातील सर्व पतंग विक्रेत्यांची सखोल चौकशी केली जात असून, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त नवले आणि सपोआ राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.






