
सलूनच्या नावाखाली लपूनछपून सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी धाड टाकली अन् भांडाफोड झाला
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात नागपुरात गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने ‘ऑपरेशन शक्ती’अंतर्गत अजनी ठाण्यांतर्गत मेडिकल रुग्णालयाजवळील स्पा-सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापारावर धाड टाकली. यात पोलिसांनी एका पीडितेला ताब्यात घेत रॅकेट चालवणाऱ्या दोन महिलांना अटक केली.
प्रतिमा रमेश बडगे (वय ४२, रा. योगेश्वरनगर, दिघोरी) आणि किरण दयाळू उके (वय ३६, रा. दत्तवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अजनी रोडवर मेडिकल रुग्णालयाजवळील अंबर अपार्टमेंट येथील एक्झॉटिक स्पा अँड सलूनमध्ये देहव्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. ग्राहकाने संबंधित महिलांशी सौदा पक्का होताच पोलिसांना इशारा दिला आणि धाड टाकण्यात आली.
हेदेखील वाचा : पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांना माहिती मिळताच…
या झडतीमध्ये पोलिसांना तेथे एक 19 वर्षांची पीडित मुलगी मिळाली. आरोपी पैशांचे आमिष दाखवून त्या मुलीकडून देहव्यापार करून घेत होते. पोलिसांनी प्रतिमा आणि किरण दोघांनाही अटक केली. त्यांच्याविरुद्ध अजनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, प्रतिमा ही सलूनची मालकीण आहे, तर किरण स्वागत कक्षात बसून ग्राहकांकडून पैसे घेतो. प्रतिमाला यापूर्वीही देहव्यापाराच्या एका प्रकरणात अटक झाली होती. आरोपींकडून दोन मोबाईल आणि रोख असा एकूण 27230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पीडित मुलगी ही नागपूरचीच आहे. तिला कमी वेळेत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी जाळ्यात अडकवले होते.
पुण्यातही पोलिसांकडून कारवाई
दुसरीकडे, पुण्यातून गुन्हेगारीची एक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Mumbai Crime: मामा-मामीनेच चिमुकलीला विकलं; दुप्पट रकमेवर पुढे विक्री, 48 तासांत पोलिसांनी केली सुटका