Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: पुण्याचा व्यावसायिक मुंबई विमानतळावरून गायब; मलेशिया ट्रिप रद्द, फोन बंद, परतताच उलगडलं रहस्य

बिझनेस ट्रिपच्या नावाखाली मलेशियाला जाण्यासाठी घरातून निघालेला पुण्याचा व्यावसायिक मुंबई विमानतळावरून अचानक गायब झाला. फोन बंद झाल्याने पत्नीने अपहरणाची तक्रार केली; मात्र काही तासांनी व्यावसायिक स्वतः पोलीस ठाण्यात हजर होताच संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 18, 2026 | 11:37 AM
Mumbai: पुण्याचा व्यावसायिक मुंबई विमानतळावरून गायब; मलेशिया ट्रिप रद्द, फोन बंद, परतताच उलगडलं रहस्य

Mumbai: पुण्याचा व्यावसायिक मुंबई विमानतळावरून गायब; मलेशिया ट्रिप रद्द, फोन बंद, परतताच उलगडलं रहस्य

Follow Us
Follow Us:
  • पुण्याचा व्यावसायिक अचानक बेपत्ता
  • मलेशिया ट्रिप रद्द अन् फोन बंद
  • पोलिसांत पोहोचताच रहस्य उलगडलं 
मुंबई : बिझनेस ट्रिपच्या नावाखाली मलेशियाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेला पुण्यातील ४६ वर्षीय लाँड्री व्यावसायिक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. पतीशी संपर्क होत नसल्याने आणि त्याचा फोन बंद असल्याने पत्नीने सहार पोलिसांकडे धाव घेत अपहरणाची तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर बुधवारी रात्री संबंधित व्यावसायिक स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणामागील वेगळीच कहाणी समोर आली.

मलेशियाला जाण्यासाठी घरातून निघाला

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक सोमवारी रात्री क्वालालंपूरला जाण्यासाठी घरातून निघाला होता. त्याने कुटुंबीयांना ही व्यावसायिक कामासाठीची ट्रिप असल्याचे सांगितले होते. दोन मित्रांनी त्याला मुंबई विमानतळावर सोडले. मात्र, प्रत्यक्षात त्याने एका महिला मैत्रिणीसोबत मलेशियाला जाण्याचे नियोजन केले होते. दोघेही विमानतळावर पोहोचल्यानंतर इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान या प्रवासाला अचानक ब्रेक लागला.

हेही वाचा: Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

जुन्या पासपोर्टमुळे ट्रिप रद्द

महिला मैत्रिणीकडे जुना पासपोर्ट असल्याचे इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या तपासणीत आढळले. त्यामुळे तिला पुढील प्रवासाची परवानगी मिळाली नाही. मैत्रिणीला मलेशियाला जाता येणार नसल्याने व्यावसायिकानेही आपला प्रवास रद्द केल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर दोघे विमानतळाबाहेर पडले आणि सीएसटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने गेले. याचदरम्यान व्यावसायिकाने आपला मोबाईल फोन बंद केला.

पत्नीला मात्र इमिग्रेशनची वेगळी माहिती

विमानतळावर असताना त्याने एका लँडलाईनवरून पत्नीशी संपर्क साधला होता. इमिग्रेशनच्या समस्येमुळे त्याचा मोबाईल जमा करण्यात आल्याचे त्याने पत्नीला सांगितले. त्यानंतर दुपारी ३.३५ वाजता त्याने पत्नीला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला आणि समस्या लवकरच सुटेल, असे सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. मित्रांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.

हेही वाचा: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

पत्नीने पोलिसांत तक्रार केली

पतीचा ठावठिकाणा लागत नसल्याने पत्नीने सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या बेपत्ता होण्याचा तपास सुरू केला. दरम्यान, बुधवारी रात्री हा व्यावसायिक स्वतःहून सहार पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांना विमानतळावर घडलेल्या घटनाक्रमाची माहिती दिली. मलेशिया दौरा रद्द झाल्यानंतर तो महिला मैत्रिणीसोबत सीएसटीच्या दिशेने गेला होता आणि त्याने फोन बंद केला होता, असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे सुरुवातीला अपहरणाचा संशय निर्माण झाला असला तरी व्यावसायिक स्वतःहून परतल्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांकडून या संपूर्ण घटनाक्रमाची पडताळणी सुरू आहे.

Web Title: Pune businessman missing mumbai airport malaysia trip cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • crime news mumbai
  • Missing Case
  • mumbai airport
  • Mumbai Crime case

संबंधित बातम्या

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!
1

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

Mumbai Airport: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चा कायापालट होणार; २०३० पर्यंत नवे टर्मिनल उभारण्याचे लक्ष्य
2

Mumbai Airport: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ चा कायापालट होणार; २०३० पर्यंत नवे टर्मिनल उभारण्याचे लक्ष्य

Tiger Shroff Firing Case Update: सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?
3

Tiger Shroff Firing Case Update: सुरक्षा रक्षकांशिवाय फुटबॉल खेळत होता टायगर! शूटर अगदी जवळ, तरीही का नाही झाला हल्ला?

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी
4

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.