Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक! राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू; कुटुंबीयांचा ‘रॅगिंग’चा गंभीर आरोप

पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग असे आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 13, 2025 | 08:43 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग असे असून तो मूळचा लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट रॅगिंगचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.

शेवटी जुन्या वादाने जीव घेतलाच! तुर्भेत मध्यरात्रीच्या हल्ल्यातील इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू, १० आरोपीवर गुन्हा दाखल

काय घडलं नेमकं?

सकाळी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये नियमित प्रशिक्षण होत असे. मात्र शुक्रवारी अंत्रीक्ष प्रशिक्षणासाठी गैरहजर होता. त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला शोधले. तेव्हा तो खोलीत बेडशीटला लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खडकवासला येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तम नगर पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासात पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे.

कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

त्याच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहे. त्याच्या कुटुंबीयांचा म्हणणं आहे, मागील काही दिवसांपासून सिनियर कॅडेट्सकडून अंत्रीक्षला खूप त्रास दिला जात होता. आम्ही ही बाब अकादमीच्या अधिकाऱ्यांच्या निर्दशनास आणून दिली होती. पण दुर्लक्ष झाले. हा छळ असह्य झाल्यानेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. असा आरोप त्यांनी केला आहे. हा रॅगिंगचाच प्रकार आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अश्या भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्या आहेत. कुटुंबीयांनी पुणे पोलिसांकडेही आपला जबाब नोंदवला आहे.

पोलिसांची भूमिका काय ?

पुणे पोलिसांनी या प्रकरणाची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शिवाय आम्ही याचा सखोल तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि सर्व बाजूंच्या चौकशीनंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणाबद्दल भाष्य करता येईल असं पोलीसंनी सांगितलं आहे. रॅगिंगच्या आरोपाची अद्याप पुष्टी झालेली नाही असं ही पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

NDA ची भूमिका काय?

एनडीए प्रशासनाने या दुःखद घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अकादमीने एका अधिकृत निवेदनात, घटनेमागील परिस्थितीचा पूर्ण तपास करण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ (Court of Inquiry) करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलीस आणि एनडीएची ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ अशा दोन्ही स्तरांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

दारु पिण्याच्या कारणावरुन वाद, जाब विचारायला दोघे घरी गेले अन् पुढे घडलं भयानक

 

Web Title: Pune crime 18 year old cadet dies at national defence academy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 08:43 AM

Topics:  

  • crime
  • NDA
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: लग्नाला केवळ सहा महिने आणि… नवविवाहितेने संपवलं आयुष्य; सहा पानी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप
1

Nashik Crime: लग्नाला केवळ सहा महिने आणि… नवविवाहितेने संपवलं आयुष्य; सहा पानी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
2

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

Dombivali Crime: किरकोळ वादाचं भीषण शेवट! पतीने पत्नीचा घेतला जीव, तीन मुले पोरकी; डोंबिवली येथील घटना
3

Dombivali Crime: किरकोळ वादाचं भीषण शेवट! पतीने पत्नीचा घेतला जीव, तीन मुले पोरकी; डोंबिवली येथील घटना

Ahilyanagar Crime: शरद पवार गटाच्या नेत्यावर सत्तूर–तलवारीने हल्ला, 15 जणांचा गँग-अटॅक; प्रकृती चिंताजनक
4

Ahilyanagar Crime: शरद पवार गटाच्या नेत्यावर सत्तूर–तलवारीने हल्ला, 15 जणांचा गँग-अटॅक; प्रकृती चिंताजनक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.