Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात थरारक! चंदननगरात 18 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करत निर्घृण हत्या; ३ जण जखमी

पुण्यातील चंदननगरात 18 वर्षीय लखन वाघमारे याची शनिवारी रात्री गार्डनमध्ये चाकूने हत्या करण्यात आली. जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय. घटनेत दोघे जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 07, 2025 | 10:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुणे चंदननगर परिसरातील घटना
  • 18 वर्षीय सोनू उर्फ लखन वाघमारेचा चाकू हल्ल्यात मृत्यू
  • दोन तरुण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
पुणे: पुणे शहरामधून हत्येची एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर यावेळी तरुणाच्या मित्रांवर देखील वार करण्यात आले. यात दोन जण जखमी झाले आहे. जखमी तरुणावर उपचार सुरु आहेत. ही घटना
चंदननगर परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पूर्ववैमानस्य आणि स्थानिक वादावादीतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Bribe News: ८ कोटींची लाच, ३० लाख घेताना अटक; पुण्यातील सोसायटीच्या प्रशासकावर गुन्हा दाखल

काय घडलं नेमकं?

चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी काही तरुण एकत्रित जमले होते. यावेळी काही अज्ञात आरोपींनी १८ वर्षीय सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार केले. लखन थेट रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याचे मित्र देखील जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले.

तपास सुरु

या घटनेची माहिती चंदननगर पोलिसांना तातडीने देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्व वादातून घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रावाना केला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस तपास करत आहे.

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्या एका चोरट्याला फुरसूंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, शेजाऱ्याचेच घर फोडल्याने तसेच नर्तकीसाठी चोर झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ६ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पाच तोळ्याचे दागिणे जप्त करण्यात आले होते. त्याने हे दागिणे एका सोनाराकडे विक्री केले होते.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांच्या पथकाने केली आहे. होळकरवाडी येथील राहणारे अभिजित पठारे यांच्या घरात चोरी झाली होती. विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरी केला होता. दरम्यान, याप्रकरणी, अभिजित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फुरसूंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस तपास करत होते.

Buldhana Crime: बस स्थानकातून गायब झालेल्या ‘त्या’ मुली सापडल्या; २४ तासात पोलिसांनी मुलींना केलं पालकांच्या स्वाधीन

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: चंदननगरातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: अज्ञात आरोपींनी चाकूने सपासप वार करून हत्या केली.

  • Que: तपासाची स्थिती काय?

    Ans: पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Pune crime 18 year old youth brutally murdered with knife in chandannagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Mayor office bomb threat: पुण्यात हायअलर्ट! महापौर कार्यालयाला IED बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क
1

Pune Mayor office bomb threat: पुण्यात हायअलर्ट! महापौर कार्यालयाला IED बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

Pune Crime: जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट
2

Pune Crime: जेवायला जातो’ म्हणत घराबाहेर पडला, अटल सेतूवरून घेतली समुद्रात उडी; कारण अद्याप अस्पष्ट

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…
3

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण
4

Satara Crime: ‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.