Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: दारू पिताना झाला वाद, आईवरून शिवीगाळ अन् रक्तरंजित शेवट; फरशीच्या दगडाने तरुणाचा निर्घृण खून

पुण्यातील धनकवडी येथे आईवरून शिवीगाळ झाल्याच्या रागातून एका तरुणाची फरशीचा दगड डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शंकर महाराज उड्डाणपुलाखाली घडली. सहकारनगर पोलिसांनी काही तासांतच आरोपी किरण उर्फ बिट्या वाघमारे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 13, 2026 | 10:00 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • धनकवडीत दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाची फरशीच्या दगडाने हत्या.
  • आईवरून शिवीगाळ झाल्याच्या रागातून आरोपीने हल्ला केल्याची कबुली दिली.
  • सहकारनगर पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाची फरशीचा दगड डोक्यात घालून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धनकवडी येथील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत काही तासांतच आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Buldhana Crime: रात्री शेतात गेले आणि मृतावस्थेत आढळले! प्रसिद्ध डॉ. गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू

काय घडलं नेमकं?

शंकर महाराज उड्डाणपुलाखाली किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय २४, रा. शंकर वसाहत, संभाजीनगर) आणि त्याचा एक मित्र हे दोघे जण एकत्र बसून दारू पीत होते. दारू पित असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात बाचाबाची सुरु झाली. हा वाढ इतका विकोपाला गेला की किरणच्या मित्राने थेट आईवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्या आईवरून दिलेल्या या शिवीचा किरणला प्रचंड राग आला. किरणने तिथेच पडलेला एक मोठा फरशीचा दगड उचलला आणि थेट दुसऱ्याच्या डोक्यात घातला. हा वार इतका गंभीर आणि भीषण होता की, किरणांचा मित्र गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आरोपी तिथून फरार झाला.

उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या नागरिकांना हा रक्ताने माखलेला मृतदेह दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरु करून अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीत आईवरून शिवी दिल्याचा राग सहन न झाल्यानेच आपण हा खून केल्याची कबुली आरोपी किरण वाघमारे याने दिली.

पुढील तपास सुरु

पोलिसांनी आरोपी किरण वाघमारे विरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा (IPC/BNS अंतर्गत) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Nagpur Crime: मुख्यमंत्री फडणवीस-गडकरींचा कार्यक्रम संपताच परिसरात रक्तरंजित थरार; 10 रुपयांवरून एकाची हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना पुण्यात नेमकी कुठे घडली?

    Ans: धनकवडीतील शंकर महाराज उड्डाणपुलाखाली.

  • Que: हत्या करण्यामागील कारण काय होते?

    Ans: आईवरून शिवीगाळ झाल्याच्या रागातून.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी किरण उर्फ बिट्या वाघमारे याला काही तासांतच अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Pune crime argument while drinking abuse involving ones mother and a bloody end youth brutally murdered with a paving stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
1

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील
2

Navi Mumbai Crime: प्रदूषण नियमांचे उल्लंघन भोवले; तुर्भे सेक्टर 19 मधील बांधकाम साईट सील

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!
3

PepsiCo Pune Plant : पेप्सिको इंडियाच्या पुणे प्लांटचे रौप्य महोत्सवी वर्ष! 25 वर्षांचा यशस्वी प्रवास, शेकडो शेतकऱ्यांना बळ!

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
4

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.