काय घडलं नेमकं?
परिसरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत डीजेचा आवाज सुरु होता. हिच मिरवणूक बघण्यासाठी रंजना जाधव घरातील काम आटोपून रस्त्यावर आल्या होत्या. मात्र काही वेळानंतर त्यांच्या छातीत वेदना झाल्या, नंतर त्या अचानकपणे जमिनीवर कोसळल्या. डीजेच्या आवाजाने त्यांनी मदतीसाठी आरोळ्या ठोकल्या पण त्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. सोबतीला असलेल्या महिलांना संबंधित प्रकरणाची बाब लक्षात आली असता. त्यांनी मदतीसाठी हालचाल केली.
Mumbai Crime: शरीरसुख नाकारलं…आणि थेट हत्या! Mira Road मध्ये अभिनेत्याने मोलकरणीचा जीव घेतला
जाधव यांना तातडीने रुग्णालयात रिक्षातून पाठवण्यात आले होते. मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली, यामुळे रुग्णालयात जाणं कठीण होऊन बसलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी केली आणि अशातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
घटनास्थळी पोलीस उपस्थित असूनही…
मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा सौरभ जाधव यांनी डीजेच्या अति आवाजामुळे आईला मोठा त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोलीस असूनही त्यांनी ध्वनीच्या आवाजावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वेळतेच उपचार मिळू न शकल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनं शहरात असणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समोर आले आहे.
Pune Crime: संशयातून रक्तरंजित शेवट! पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू; बिबवेवाडी हादरलं!
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने आपल्या पत्नीवर धारदार शास्त्राने भीषण हल्ला केल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा गुरुवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सारिका शुभम घोडके असे या २३ वर्षीय मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: पुण्यातील ससाणे नगर परिसरात.
Ans: डीजेच्या तीव्र आवाजामुळे आणि उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप.
Ans: ध्वनीप्रदूषण आणि मिरवणुकीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.






