Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: दुहेरी हत्याकांड! पोटच्या मुलाने वडील आणि सख्ख्या भावाचा घेतला जीव; मृतदेहाशेजारीच काढली रात्र

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ येथे पोटच्या मुलानेच वडील आणि सख्ख्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपी रात्रभर दोन्ही मृतदेहांच्या शेजारीच झोपून राहिला. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 04, 2026 | 09:47 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्नर तालुक्यात मुलानेच वडील आणि सख्ख्या भावाची हत्या केल्याची घटना उघड.
  • आरोपी बाबाजी मुकणे हा रात्रभर मृतदेहांच्या शेजारीच झोपून होता.
  • कौटुंबिक वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज; पोलिस तपास सुरू.
पुणे: पुणे जिल्ह्यातून दुहेरी हत्येचे प्रकरण समोर आले आहे. पोटच्या मुलानेच आपल्या वडिलांसह सख्ख्या भावाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून त्याने आपल्या वडिलांची आणि भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील पारगाव तर्फे मढ गावातील परिसरात बगाडवाडी येथील आहे.

Pune Crime: कारसाठी २ लाख, फ्लॅटसाठी ३ लाख, तणावात गर्भपात आणि…; मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने संपवले जीवन

कशी उघडकीस आली घटना

मृत वडिलांचे नाव जयराम महादू मुकणे (वय 65) आणि मृत मुलगा राजू जयराम मुकणे (वय 30) असे आहे. तर आरोपीचे नाव बाबाजी मुकणे असे आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर तो रात्रभर दोन्ही मृतदेहांच्या शेजारी झोपून राहिला होता. सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना मृतदेह आढळून आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असता त्याची चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक तपासातून कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास ओतूर पोलीस करत आहे.

पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या; विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने दारू पिण्यास मनाई केल्याचा राग अनावर झाल्याने एका पतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या आत्महत्येच्या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed Crime: हुंडाबळीचा आणखी एक बळी! ‘पैसे घेऊन ये’ म्हणत सतत छळ; 20 वर्षीय पूजाने उचललं टोकाचं पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेत कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: जयराम महादू मुकणे आणि त्यांचा मुलगा राजू जयराम मुकणे यांची हत्या करण्यात आली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: मृत व्यक्तींचाच मुलगा आणि भाऊ असलेला बाबाजी मुकणे हा मुख्य आरोपी आहे.

  • Que: पोलिसांना ही घटना कशी समजली?

    Ans: सकाळी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

Web Title: Pune crime double murder son kills father and biological brother spends the night right next to the bodies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
1

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
2

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
3

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
4

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.