Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime news: आधी ५० कोटींची खंडणी, नंतर थेट गोळीबार! पुण्यात लॉरेन्स बिष्णोई गँगची दहशत?

Pune Crime news: पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात असलेल्या फर्निचर व्यावसायिकाच्या दालनासमोर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. पंधरा दिवसांपूर्वी रावेत भागात गोळीबार करण्यात आला, फर्निचर व्यावसायिकाला लॉरेन्स बिष्णोई टोळीतील सराईतांनी खंडणीसाठी धमकाविले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 12:35 PM
Pune Crime, Lawrence Bishnoi Gang,

Pune Crime, Lawrence Bishnoi Gang,

Follow Us
Follow Us:
  • लोखंड व्यापाऱ्याच्या आणि त्यांच्या मामाच्या मुलाच्या मोबाईलवर ‘आरजू बिश्णोई’ नावाच्या व्यक्तीचा फोन
  • व्यापाऱ्याने तात्काळ ओडिसा येथील एका परिचयाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याशी संपर्क
  • पोलीस तक्रारीची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे फुरसुंगी येथील व्यापाऱ्याच्या दुकानावर अज्ञात आरोपींनी थेट गोळीबार
Pune Crime news: गैंगस्टर लॉरेन्स बिष्णोई टोळीचे पुणे कनेक्शन दोन वेगवेगळ्या घटनांमधून समोर आल्यानंतर आता या टोळीने पुण्यात पाय रोवण्यास सुरूवात केली असून, प्रसिद्ध व्यावसायिकांना ५० कोटींच्या खंडणीसाठी आधी फोनद्वारे धमकी देऊन नंतर काही तासातच त्यांच्या दुकानावर गोळीबार घडवून आणल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. याघटनेमुळे पुर्ण शहरात खळबळ तर उडाली आहेच पण बिष्णोई टोळीच्या या गोळीबाराने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण देखील निर्माण केले आहे.

हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात हा प्रकार घडला आहे. दरम्यान, गोळीबारानंतर गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरापर्यंत गोळीबार करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत होते.

लग्नाच्या केवळ 24 तासांतच नवरी गेली पळून; सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला गंडा

महंमदवाडी हडपसर येथील ४१ वर्षीय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार, फुरसुंगी पोलिसांनी आरजू बिश्णोई गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि २२) दुपारी साडेचार वाजतापासून ते रात्री घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायिक असून, त्यांचा लोखंडाचा व्यवसाय आहे. व्यवसायिकाच्या मामाच्या मुलाच्या मोबाईलवर देखील आरजू याने फोन करून तुम्ही दहाजण पार्टनर आहेत. मला प्रत्येकाकडून ५ कोटी रुपये हवे आहेत. मी लॉरेन्स बिष्णोई टोळीतून बोलतोय. मला दोन दिवसात पैसे हवे आहेत, असे बोलून त्याने फोन कट केला.

व्यवसायिक आणि त्याच्या मामाच्या मुलाला एकाचवेळी फोन आल्याने त्याने आपल्या ओळखीच्या ओडीसा येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांनी व्यवसायिकाला वानवडी पोलिस ठाण्यात पाठवले. पोलिस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी माहिती घेऊन त्या व्हॉट्सअप क्रमांकावर फोन केला. मात्र तो उचलला नाही. हा प्रकार फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने व्यवसायिक तेथे पोहचले. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच इकडे गोळीबाराची घटना घडली आणि एकच खळबळ उडाली.

“आरजू बिष्णोई नावाच्या व्यक्तीने फोन करून व्यवसायिकाकडे खंडणीची मागणी केली. व्यवसायिक पोलिस ठाण्यात असताना, त्यांच्या गोडाऊनवर गोळीबार करण्यात आला आहे. याप्रकरणी, फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.”
गोहर हसन, पोलिस उपायुक्त पुणे शहर

आम आदमी पक्षाला मोठा धक्का! AAP आमदाराला 7 वर्षांचा तुरुंगवास, पत्नींसह 9 जणांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

एक घंटेमे चमत्कार दिखा दिया

व्यवसायिक फुरसुंगी पोलिस ठाण्यात पोहचले तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. पोलिसांना ते माहिती देतच होते. तेवढ्यात सव्वा आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या नोकराने फोन करून त्यांना सांगितले की, गोडाऊनवर गोळीबार झाला आहे. परत सव्वा ९ वाजताच्या सुमारास आरजू याने फोन केला. आता कोणालाच सोडणार नाही. कुटूंबातील मुलाना सुद्धा. तु गोडाऊनमधून बाहेर पड. एका तासात तुला आम्ही चमत्कार दाखविला आहे. असे बोलून फोन कट केला.

गोळीबाराची खळबळ

Pune Crime त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास करुन खंडणी प्रकरणात आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पुण्यात अशीच घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये बिष्णोई टोळीची मोठी दहशत वाढत चालल्याचे दिसत आहे.

 

 

 

Web Title: Pune crime lawrence bishnoi gang demands 50 crore extortion fursungi shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Lawrence Bishnoi
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
1

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.