Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना कोढवा भागात घडली आहे. टोळक्याने तरुणाबरोबर असलेल्या मित्रांनाही मारहाण केली आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 14, 2026 | 03:05 PM
महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार, मित्रांनाही मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यासह राज्यभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणावर शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना कोढवा भागात घडली आहे. टोळक्याने तरुणाबरोबर असलेल्या मित्रांनाही मारहाण केली आहे. मोहम्मद उस्मान कामील खान (वय १९, रा. मीठानगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खान याने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खान आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. आरोपी कोंढव्यातील मीठानगर भागात राहायला आहेत. किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. (दि. १२ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास खान आणि त्याच्याबरोबर असलेले दोन मित्र कोंढव्यातील पारगेनगर चौकातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी खान आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना अडवले. आरोपींनी खान याच्यावर शस्त्राने वार केले. त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना मारहाण केली. खान याच्या डोक्यात दगड घालून आरोपी पसार झाले. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा  : तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजू इककळकी बुधवारी (१२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात थांबला होता. आरोपी राजू याचा ओळखीचा आहे. आरोपी प्रेम याने त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. पण, त्याने दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी चिडून जाऊन राजू याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झाल्यानंतर आरोपीने त्याला दगडाने मारहाण केली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.

Web Title: A shocking incident of a college student being assaulted has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम
1

‘तुम्ही नाही केलं तर आम्ही करू’; फूड वॉर्निंग लेबलवर सुप्रीम कोर्टाचा केंद्राला अल्टिमेटम

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक
2

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?
3

ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

शासनाला घातला बारा लाखाचा गंडा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.