पुण्यात गेल्या आठवड्यात दहशतवादी विरोधी पथकाकडून कोंडव्यामध्ये दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या दहा ठिकाणी एटीएसच सर्च ऑपरेशन सुरू होत. त्यात टाकलेल्या छाप्यात एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांना मदत मदत केल्याच्या संशयावरून एटीएसने पुण्यात दहा ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करून आता त्याची चौकशी केली जात आहे.
Delhi Crime: जुन्या बॉय फ्रेंडसाठी नव्याला जिवंत जाळलं! दिल्लील मन हादरवणारे कांड
एटीएसने का राबवलं सर्च ऑपरेशन ?
पुण्यात करण्यात आलेली ही कारवाई 2023 मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या ISIS-संबंधित दहशतवादी कारवायाशी होती. ज्या प्रकरणात मुंबई, पुणे आणि गुजरातमधील काही भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला गेला होता. त्या आरोपाखाल अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली होती. तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती ती म्हणजे आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्ब चाचणी घेतली होती. त्यांच प्रशिक्षण कोंढवा परिसरात झालं होत. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेवून घातपात करण्याचा त्यांचा डाव होता त्यातील एकाला आज पुणे एटीएसने अटक केली आहे.
पुण्यात गेल्या वर्षी घेतलं बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण
गेल्या वर्षी पुण्यातील जंगलात बॉम्ब बनवण्याच साहित्य पुरून ठेवलं होत. त्या ठिकाणी रोज जंगलात जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतल जायचं. गेल्या वर्षी एटीएसने मोठी कारवाई केली होती. ज्याचा पुण्याशी संबंध होता. त्याच आरोपाखाली आज एक जणाला अटक करण्यात आली आहे.
पुणे हादरलं! महिलेला लिफ्ट दिली; दुचाकीवर बसवून झाडीत नेले अन्…
राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता भिगवणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिगवण परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या महिलेला दुचाकीवर बसवून तिला झाडीत नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीचे रेखाचित्र तयार करून त्याद्वारे आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व अधिकारी व पथकाचे कर्मचारी उपस्थित होते. जाक्या कोंडक्या चव्हाण (वय ३०, रा. लिंगाळी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चव्हाण यांच्यावर यापूर्वी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली होती.
Satara Doctor Death Case: डॉक्टरांकडून हॅशटॅगवर ‘ट्विटर वादळ’; आत्महत्या प्रकरणात केली मोठी मागणी






