crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात रोज वर्दळ असते. केसेसच्या निमित्ताने पक्षकार, वकील, यांची मोठी गर्दी असते. आरोपींना आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त पण लावलेला असतो. मात्र आज कोर्टाच्या आवारातच चौथ्या मजल्यावर जात एका व्यक्तीने उडी मारत आत्महत्या केली आहे. उडी एवढी जोरात मारली की त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कोर्टाच्या आवारातच चौथ्या मजल्यावर सगळ्यांची नजर चुकवत वरती गेला आणि स्वतःला संपवल.
Odisa Crime: दोन दिवसांच्या नवजात बाळाची विक्री! आईनेच केला ५० हजारात सौदा; चार मुलं झाली म्हणून…
आत्महत्या करण्याच कारण नक्की काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नामदेव जाधव (वयवर्ष ६०) अस नाव आहे. आत्महत्या करताना त्याने एक चिठ्ठी पण लिहिली आहे. या चिठ्ठीत त्याने आपल्या केसचा उल्लेख केला आहे. अनेक वर्षापासून एक सिविल केस ही प्रलंबित आहे. आत्महत्या करताना तो चौथ्या मजल्यावर गेला आणि कोणी नाही याची खात्री करत थेट त्याने खाली उडी घेतली. उडी घेतल्यावर डोक्याच्या मागच्या बाजूला मार लागला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केल. मात्र जागीच मृत्य झाल्याने रुग्णालयात गेल्यावर मृत घोषित करण्यात आल.
केस काय होती ?
आत्महत्या करताना लिहिलेल्या चिठ्ठीत एका केसचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी सध्या याचा तपास सुरू केला आहे. नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र केस संदर्भात अजून माहिती पोलिसांनी दिली नाही. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मृतक आत्महत्या करण्यापूर्वी कोणाशी बोलला होता का? किवा ती केस किती वर्षापासून प्रलंबित आहे ? नक्की अडचण काय होती ? हे अद्याप कळू शकलेल नाही. मात्र पोलीसांकडून तातडीने पंचनामा करण्यात आला आहे.
कोर्टात बघ्यांची गर्दी
कोर्ट परिसरात उपस्थित असणाऱ्या वकिलांना जशी या घटनेची माहिती मिळाली. तशी बघण्यासाठी मोठी गर्दी आवारात वकिलांनी केली. उडी मारल्यावर एका वकिलाने पोलिसांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पोलिसांमार्फत याचा तपास केला जाईल. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई पण केली जाईल. मात्र कोर्टाच्या आवारातच आत्महत्या केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे .