Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात संतापजनक प्रकार! बसस्टॉपवर महिलेसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत

पुण्यातील चिंचवड परिसरात बसस्टॉपवर उभ्या असलेल्या 24 वर्षीय महिलेसमोर एका व्यक्तीने अश्लील कृत्य करत विनयभंग केला. आरोपीने गुप्तांग दाखवत अश्लील हावभाव केले. पीडित महिलेने धाडसाने घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. CCTV तपासानंतर पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 09:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बसस्टॉपवर महिलेसमोर आरोपीने अश्लील कृत्य केले.
  • पीडितेने आरोपीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.
  • CCTV फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय महिलेसोबत अश्लील आणि विनयभंगाची विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घडलेली घटना पिंपरी चिंचवड येथील मदर तेरेसा फ्लायओव्हरजवळील एम्पायर इस्टेट बीआरटी बस स्टॉपवर २१ मे घडली. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं ?

पीडित महिला तिच्या कंपनीच्या खासगी बसची वाट पाहत होती. दरम्यान तिथे आधीच बसलेल्या झाकीर हमीद शेख नावाच्या व्यक्तीची तिच्याकडे एकटक पाहत होता. एवढेच नाही तर आरोपीने पँटची चैन खोलून गुप्तांग उघडे केले. त्यानंतर तिच्या दिशेने अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.

Buldhana Crime: बुलढाण्यात हृदयद्रावक घटना! पोटच्या चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून वडिलांची आत्महत्या

या भयानक कृत्याने महिला भयभीत झाली, तिने हिम्मत करून तात्काळ मोबाइल काढला आणि आरोपीच्या कृत्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला, इतक्यात आरोपीने घटनास्थळावरून धाव घेतली. घटनास्थळावरून पळून जाताना आरोपी कपडे देखील बदलले होते. पीडित महिला ही पिंपरी पोलीस ठाण्यात गेली आणि तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आणि सुमारे 70 ते 80 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपी झाकीर हमीद शेख याला अटक केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

संतापजनक! पतीने गॅस सिलेंडर डोक्यात घालून पत्नीची केली हत्या; पोलीस ठाण्यात जाऊन स्वतः दिली कबुली

पुण्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीच्या डोक्यात तब्बल पाच किलोचा वजनाचा गॅस सिलेंडर घालून तिची हत्या केली. ही घटना येवलेवाडी परिसरातील बांधकाम मजुराच्या कॅम्पमध्ये घडली. हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठवत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

काय घडलं नेमकं?

घटनेच्या दिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान पतीचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेला पाच किलोचा वजनाचा गॅस सिलेंडर उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, यात महिलेचा मृत्यू झाला.

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; एसटी बस अन् दुचाकीच्या धडकेत 4 तरुणांचा जागीच मृत्यू

यानंतर आरोपी पतीने स्वतः पोलीस स्टेशन गाठले आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले आणि घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मुद्देह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून खत त्यासाठी वापरलेला सिलेंडर जप्त केलाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला केला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: चिंचवडमधील मदर तेरेसा फ्लायओव्हरजवळील बीआरटी बस स्टॉपवर ही घटना घडली.

  • Que: पीडित महिलेने काय धाडस केले?

    Ans: तिने आरोपीच्या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला.

  • Que: पोलिसांनी आरोपीला कसे पकडले?

    Ans: 70 ते 80 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत अटक केली.

Web Title: Pune crime outrageous incident in pune obscene act committed in front of woman at bus stop accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
1

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात
2

Nashik News: नाशिकमध्ये महिला चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ! दररोज १०० डीपींमधून फ्युज चोरीला; सातपूरकर तासनतास अंधारात

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
3

Dombivli Drug Case: ‘माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे…’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
4

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.