Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात असल्याचे सांगितले जात होते, मात्र पोलिस तपासात त्याला दरीत ढकलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या कथित प्रियकराची चौकशी सुरू आहे. तपासातून सत्य समोर येणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 09:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोहगडावर केतन अग्रवालचा मृत्यू अपघात नसल्याचा पोलिसांना संशय.
  • वाढदिवसाच्या निमित्ताने दोघे ट्रेकिंगसाठी गेले होते.
  • पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू.
पुणे:  पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, केतनचा मृत्यू हा अपघात नसून त्यामागे कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या कथित प्रियकराची चौकशी सुरू असून, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सर्प्राइजची व्हिडीओ आणि फोटो शेअर

केतन अग्रवाल आपल्या होणाऱ्या पत्नी सिया गोयलवर मनापासून प्रेम करत होता. तिच्या प्रत्येक आनंदाची काळजी घेणारा केतन लग्नानंतरच्या नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत होता. सियाच्या वाढदिवसानिमित्त त्याने विशेष नियोजन केले होते. वाढदिवसाच्या एक महिना आधीच त्याने तिच्यासाठी खास सरप्राईजची तयारी केली होती. या क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो स्वतः सियाने सोशल मीडियावर शेअर केले होते.

व्हिडीओमध्ये काय?

18 मे रोजी शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये केतन सियाला अलिशान कारमध्ये फिरायला घेऊन जाताना दिसतो. तिच्यासाठी फुले, भेटवस्तू आणि खास सजावट करून तो तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये दोघांनी वाढदिवसाचे सेलिब्रेशनही केले होते. या व्हिडिओमध्ये दोघांमधील प्रेम आणि जिव्हाळा स्पष्टपणे दिसून येत होता.

तू मला माझ्या वाढदिवशीच सोडून गेलास…

मात्र, या आनंदी चित्रामागे काही वेगळे वास्तव दडले होते. कारण, याच व्हिडिओनंतर अवघ्या एका महिन्यात केतनचा संशयास्पद मृत्यू झाला. विशेष म्हणजे, घटनेनंतर सियाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत “तू मला माझ्या वाढदिवशीच सोडून गेलास” अशा आशयाचा संदेश लिहिला होता. आता हा व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Latur Crime: आधी प्रेमसंबंध, मग मालमत्तेचा वाद… शेवटी तोंडावर उकळते तेल; उदगीरच्या घटनेने खळबळ

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आग्रह

मिळालेल्या माहितीनुसार, सियाने तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार दोघे तेथे गेले. सुरुवातीला फोटो काढताना केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांना संशय आला आणि रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली. तेव्हा पोलिसांना एका संशयित तरुणाच्या हालचाली दिसल्या.१७ जूनला लोणावळ्यात प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असतांनाही एक तरुण अंगात जाडजूड ‘हुडी’ (जॅकेट) घालून वावरत होता. त्याने कानात हेडफोन घातले होते आणि हुडीच्या साहाय्याने तो स्वतःचा चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. भर उन्हातल्या या अजब पेहरावाने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली.

तेव्हा या संशयित तरुणाचा माग काढत पोलिसांना सिया गोयलच्या क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. तिने आपल्या प्रियकराशी मिळून केतनला कायमचे संपवण्याचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे १८ जूनला सिया केतनला घेऊन लोहगडाच्या एका निर्जन कड्यावर पोहोचली. तिथे आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून, सियाने तिच्या ‘हुडी’ घातलेल्या मित्राच्या मदतीने केतनला थेट दरीत ढकलून दिले.

35 वर्षांपासून मैत्री

केतनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल आणि गोयल कुटुंबांमध्ये गेल्या 35 वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. या विश्वासाच्या आधारावरच दोघांचे लग्न ठरवण्यात आले होते. केतन आणि सिया यांचा साखरपुडा यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाला होता, तर नोव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह होणार होता. लग्नासाठी राजस्थानमधील उदयपूर येथे भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी आलिशान महाल बुक करण्यात आला होता. पाहुण्यांच्या प्रवासासाठी खासगी विमानांची व्यवस्था करण्याची तयारीही सुरू होती. दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असताना ही घटना घडली.

तपास सुरु

दरम्यान, तपास यंत्रणांकडून या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी सुरू असून, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे. केतनच्या कुटुंबीयांनी मात्र आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण झाली असून, तपासाच्या पुढील निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Hit and Run Case : नागपुरात ‘हिट अँड रन’; दोघांचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवालचा मृत्यू कुठे झाला?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू झाला.

  • Que: सुरुवातीला घटनेचे कारण काय सांगितले होते?

    Ans: फोटो काढताना पाय घसरून केतन दरीत पडल्याचे सांगण्यात आले होते.

  • Que: पोलिस तपासात काय समोर आले?

    Ans: लिस तपासात ही घटना अपघात नसून संशयास्पद असल्याचे समोर आले असून चौकशी सुरू आहे.

Web Title: Pune crime you left me on my very birthday a display of love on instagram and then shocking revelations in the ketan agarwal case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.