काय घडलं नेमकं?
उद्धव मारोती दहीकांबळे (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो निडबेन परिसरात राहत होता. उद्धवचे गावातील वंदना तुळशीराम मादळे हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. तसेच उद्धवच्या वाट्याला येणारी जमीन आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या कारणावरून 12 तारखेला पहाटे या दोघात भांडण झाले. त्यानंतर आरोपी महिलेने त्याच्या तोंडावर उकळते गोडतेल ओतल्याचा सोमोर आले आहे. (Latur Crime) या हल्ल्यात उद्धव हा गंभीर भाजला. त्याच्यावर शासकीय रुग्णालय लातूर येथे उपचार सुरु आहे. आज पहाटे सुमाराने साडेचार वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Latur Crime)
Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट
आरोपी महिला फरार
उद्धवचे वडील मारोती नरसिंह दहीकांबळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 417/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 (1) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपी सध्या फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (Latur Crime)
‘माझी वाट पाहू नका…’ लंडनमधून लेकाचा शेवटचा फोन; लातूरच्या तरुणाने गळफास घेत संपवलं जीव
लातूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लंडनमध्ये आयटी इंजिनिअर म्हणून लाखोंचा पगार, उज्ज्वल करिअर आणि सुखी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या लातूरच्या तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी कुटुंबीयांना केलेला त्याचा शेवटचा फोन आणि “मी आता जगणार नाही…” हे शब्द ऐकून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भरदिवसा 3 ठिकाणी घरफोड्या; पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु
Ans: मृत तरुणाचे नाव उद्धव मारोती दहीकांबळे (वय 24) असे आहे.
Ans: ही घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील ज्ञानेश्वरनगर, शेल्हाळ रोड परिसरात घडली.
Ans: अनैतिक संबंध आणि जमीन-मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक आरोप आहे.






