
Pune Crime: "भेटायला ये" म्हणून मागे लागले अन् दबा धरून केला वार! पुण्यातून हादरवणारी बातमी समोर!
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शौर्य मोहिते (वय १७) असे हल्ला झालेल्या जखमी मुलाचे नाव आहे. काल रात्री दहाच्या सुमारास भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. हल्ला होण्यापूर्वी शौर्य आणि हल्लेखोर काही वेळ याच परिसरात एकमेकांशी बोलत उभे होते. मात्र, पाहता पाहता त्यांच्यातील जुना वाद विकोपाला गेला आणि तिघांच्या टोळक्याने शौर्यवर कोयत्याने सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. काही दिवसांपूर्वी शौर्यचा इतर मुलांशी वाद झाला होता. याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
या घटनेबाबत बोलताना जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही तरुण शौर्यला भेटण्यासाठी बोलावण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र, जीवितास धोका असल्याच्या भीतीपोटी आणि वाद टाळण्यासाठी शौर्य त्यांच्या भेटीला गेला नव्हता. अखेरीस काल रात्री दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला नेमका किती जणांनी मिळून केला, यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि नेमके कारण काय? याचा कसून तपास डेक्कन पोलीस करत आहेत.
Ans: हा हल्ला पुण्यात भिडे पुलाजवळील हॉटेल मुरलीधरच्या बाजूला असलेल्या मुख्य रस्त्यावर काल रात्री दहाच्या सुमारास घडला.
Ans: जखमी झालेल्या १७ वर्षीय तरुणाचे नाव शौर्य मोहिते असे आहे.
Ans: डेक्कन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून कसून तपास सुरू आहे.