
Mugdha Murder Mystery: घरच्यांपासून लपवून गहुंजेच्या आलिशान सोसायटीत वास्तव्य; लंडनहून आलेल्या तरुणीचा दुर्दैवी अन् रहस्यमय अंत!
मुग्धाचा मृतदेह बंद फ्लॅटमध्ये सापडल्याने या प्रकरणाला मोठे गूढ वळण मिळाले आहे. मुग्धा लंडनवरून अचानक परत का आली? तिने आपल्या भारतात असण्याबाबत कुटुंबीयांना का कळू दिले नाही? मृत्यूच्या ३ दिवस आधी तिने कामवाल्या बाईला काम बंद करण्यास का सांगितले? आणि तिचा मृत्यू नेमका कसा झाला? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस सध्या डिजिटल पुरावे, बँक व्यवहार आणि व्हिसेरा रिपोर्टच्या आधारे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.
Ans: मुग्धा देशमुख (वय ३४) ही छत्रपती संभाजीनगरची रहिवासी असून COEP मधून पदवी घेतल्यानंतर MBA साठी लंडनला गेली होती.
Ans: तिचा मृतदेह २८ ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवडजवळील गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' सोसायटीतील बंद फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला.
Ans: पालकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी बँक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि ऑनलाइन फूड ॲप्सवरील क्रेडिट कार्ड वापराच्या लोकेशनवरून तिचा शोध घेतला.