Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

पुण्यातील गुलटेकडी परिसरात प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणाला पिस्तूल रोखून बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर गोळीबार झाल्याचीही चर्चा परिसरात असून, स्वारगेट पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 30, 2026 | 02:39 PM
प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

Follow Us
Follow Us:
  • प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवल्याने १९ वर्षीय तरुणावर हल्ला
  • डोक्यावर पिस्तूल रोखून बांबूने बेदम मारहाण; जीवे मारण्याची धमकी
  • गोळीबाराची परिसरात चर्चा; FIRमध्ये उल्लेख नसल्याने पोलिसांचा तपास सुरू
 

पुणे : प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवल्याच्या कारणावरून १९ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर पिस्तूल रोखून त्याला बांबूने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत घडली. २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा: Crime News: प्रॅक्टिकल लिहून दिले नाही म्हणून जीवघेणा हल्ला; कॉलेजमध्ये तरुणीच्या गळ्यावर चाकूचे वार

‘त्या’ मुलांसोबत का फिरतोस? म्हणत जाब विचारला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी खंडू म्हात्रे (१९, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) हा २७ सप्टेंबर रोजी रात्री वसाहतीजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी सनीला प्रतिस्पर्धी गटातील तरुणांसोबत का फिरतोस, असा जाब विचारत त्याच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींपैकी एकाने सनीला धमकावत थेट पिस्तूल बाहेर काढून त्याच्या डोक्यावर रोखले. त्यानंतर इतर आरोपींनी बांबूने सनीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात तो जखमी झाला. आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.

हेही वाचा: ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

गोळीबार झाल्याची परिसरात चर्चा

दरम्यान, या घटनेच्या वेळी आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केल्याची चर्चा परिसरात पसरली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, गोळी झाडण्यात आली; मात्र ती सनीला लागली नाही आणि तो थोडक्यात बचावला. त्यामुळे घटनेनंतर परिसरात अधिकच खळबळ उडाली. मात्र, स्वारगेट पोलिसांनी दाखल केलेल्या अधिकृत तक्रारीत गोळीबाराचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गोळीबार झाला होता का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. सध्या पोलिसांकडून पसार झालेल्या चौघांचा शोध सुरू असून, घटनेमागील कारण आणि आरोपींच्या भूमिकेबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Pune gultekdi 19 year old youth pistol threat bamboo assault gang rivalry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • maharashtra. pune crime
  • pune crime case
  • Swargate Case
  • Swargate News
  • Swargate Police Station

संबंधित बातम्या

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर
1

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती
2

केतन हत्या प्रकरणात ५५०० पानी आरोपपत्र; सियाच्या जुन्या प्रेमप्रकरणापासून कोट्यवधींच्या लग्नाच्या तयारीपर्यंत धक्कादायक माहिती

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद
4

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.