पाऊस आणि पावसातला निसर्ग प्रत्येकाचं मन वेधून घेतं. हिरवागार डोंगर आणि धुक्याची चादर म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्गच. पावसात फिरण्यासाठी अशी काही धुक्याने वेढलेली गावं आहेत ज्यांना एकदातरी पावसाळ्यात भेट देणं म्हणजे स्वर्गच जणू. तामिळनाडूतील अतिशय नयनरम्य म्हणजे कोडाईकनाल. थंड हवेचं ठिकाणं म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसात आणि थंडीत डोंगरांवर मोठ्या प्रमाणात धुकं दाटतं. जे पाहणं पर्वणी आहे.
कुर्ग: पावसाळ्यात अनेक जण समुद्रकिनारी किंवा हिल्स स्टेशनला फिरायला जातात. पावसाळ्यात कर्नाटकातील कुर्ग म्हणजे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. हिरवी गर्द झाडी आणि धुकं पांघरलेलं कुर्ग शहर पर्यटकांच्या स्वर्गसुखाची अनुभूती देतं.
कोडाईकनाल: तामिळनाडूतील अतिशय नयनरम्य म्हणजे कोडाईकनाल. थंड हवेचं ठिकाणं म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसात आणि थंडीत डोंगरांवर मोठ्या प्रमाणात धुकं दाटतं. जे पाहणं पर्वणी आहे.
नैनिताल:उत्तराखंडमधील निसर्ग सौंदर्याने वेढलेलं हे छोटसं गाव. धुक्याने वेढलेलं हे गाव अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. नैनिताल पावसात धुक्यानेअतिशय सुंदर दिसतं.
लोणावळा : पुण्या-मुंबईपासून जवळंच आणि एका दिवसात जाता येईल असं ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा घाट म्हणजे पुणे-मुंबईतील पर्यटकांचं हक्काचं ठिकाण. पाऊस पडल्यानंतर दाटलेलं धुकं आणि इंद्रधनुष्य पाहणं म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूती असते.
रायगड: पावसाळ्यात गड किल्यांवर ट्रेकला जाणं कोणाला आवडत नाही? राकट आणि कणखर असला तरी त्याच्या सौंदर्याने वेड लावणारा गड म्हणजे रायगड. रायगडाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदातरी पावसाळ्यात ट्रेक करा.