
Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा प्रताप! 'साहेबांच्या' नावाचा गैरवापर करून उकळले १६ लाख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील लुंकड स्काय बेल्वेदर सोसायटीत राहणारे मनिष देवीलाल कलवार (वय ४०) हे मायनिंगचा व्यवसाय करतात. त्यांची ‘मेवारा मायनिंग सर्व्हिसेस’ नावाची कंपनी आहे. अज्ञात सायबर चोरट्यांनी त्यांच्या कंपनीच्या अकाउंटंटचा मोबाईल फोन हॅक केला. मोबाईल हॅक केल्यानंतर चोरट्याने अत्यंत चलाखीने मोबाईलमधील व्यावसायिकाच्या भावाच्या नावाने सेव्ह असलेला जुना क्रमांक डिलीट केला. त्या जागी स्वतःचा मोबाईल नंबर ‘आशिष सर’ म्हणजेच कंपनीच्या ‘साहेबांच्या’ नावाखाली सेव्ह करून घेतला. नंबर बदलल्याची कुणकुणही कोणाला लागली नाही.
हेही वाचा:Love Affair Crime: प्रेम की वेड? १५ वर्षीय प्रेयसीच्या घरदारावर प्रियकराचा रक्तरंजित हल्ला; आई ठार!
नंबर बदलल्यानंतर चोरट्याने व्हॉट्सॲपवरून थेट व्यावसायिकाला मेसेज पाठवून अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे काम असल्याचे भासवून पैसे पाठविण्यास सांगितले. मेसेज पाठवणारी व्यक्ती स्वतः ‘आशिष सर’ (साहेब) आहेत, असा पूर्ण समज झाल्यामुळे व्यावसायिकाने त्यावर पूर्ण विश्वास ठेवला. कोणतीही शहानिशा न करता त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर परस्पर १६ लाख रुपये पाठवून दिले. मात्र, काही वेळातच हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी मनिष कलवार यांनी तात्काळ विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्य दाखवत अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (IT Act) कलम ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. सायबर चोरट्यांची ही नवी पद्धत अत्यंत चिंताजनक असून नागरिकांनी आर्थिक व्यवहाराव करताना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Ans: चोरट्यांनी अकाउंटंटचा मोबाईल हॅक करून भावाचा जुना नंबर डिलीट केला आणि त्या जागी स्वतःचा नंबर 'आशिष सर' (साहेब) या नावाने सेव्ह करून १६ लाखांची फसवणूक केली.
Ans: ही घटना पुण्यातील विमाननगर परिसरातील 'लुंकड स्काय बेल्वेदर सोसायटी' परिसरात घडली असून, फिर्यादी मनिष कलवार हे मायनिंग व्यावसायिक आहेत.
Ans: पीडित व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात BNS आणि IT कायद्यान्वये अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.