Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू

अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 23, 2026 | 04:54 PM
अति भयंकर! कारचा ताबा सुटला, डिव्हायडर तोडले अन् थेट…; भीषण Accident मध्ये तिघांचा जागीच मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

मंचरजवळील एकलहरे रात्री झाला भीषण अपघात
एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
अपघातात दोन मुले गंभीर जखमी

मंचर: पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळील एकलहरे (ता.आंबेगाव) येथे रविवारी  (दि.२२) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि सासू अशा तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन शिवराज आंबेगावे (रा. पिंपरी, पुणे) हे आपल्या कुटुंबासह नाशिकहून पुण्याकडे कार (एमएच १४ डीटी  १७७०) ने येत होते.दरम्यान  एकलहरे गावाजवळ कारचा ताबा सुटल्याने ती डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या बसला (एमएच १८ बीझेड ४०६७) धडकली. या भीषण धडकेत चालक मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४२), त्यांची पत्नी आरती मल्लिकार्जुन आंबेगावे (वय ४०) आणि सासू लता तूपलोंढे (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा प्रेम मल्लिकार्जुन आंबेगावे (वय २०) आणि मुलगी मृणाल मल्लिकार्जुन आंबेगावे (वय १६) ही दोन्ही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून दोन्ही टायर फुटल्याचेही समोर आले आहे.

बसच्या पुढील बाजूच्या भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मागून आलेल्या वाहनाने हूल दिल्याने किंवा टायर फुटल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या अपघाताला कारणीभूत तसेच स्वत:च्या आणि इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून कारचालक मल्लिकार्जुन आंबेगावे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मग रिसॉर्टमध्ये लग्न केलं अन्…; लोणावळ्यातील धक्कादायक प्रकार

याबाबत बस चालक राजू चत्रू राठोड (वय ३८ रा. उजळत ता.शहादा जि.नंदुरबार) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीसांकडून सुरू आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

म़त मल्लिकार्जुन आंबेगावे  यशस्वी वास्तुअभियंता

मंचरजवळ झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या मल्लिकार्जुन आंबेगावे हे नावाजलेले वास्तु अभियंता होते. त्यांनी पीसीएमसी परिसरातील शिव असोसिएट्स या कंपनीत काम करत आपली कारकीर्द घडवली होती. सुरुवातीला त्यांनी सिव्हिल क्षेत्रात काम करताना पुण्यात नोकरी केली आणि त्याचबरोबर बीई (करस्पाँडन्स) शिक्षण पूर्ण केले.

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

त्यानंतर स्वतःची फर्म स्थापन करून त्यांनी स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली. पीएमआरडीए अंतर्गत त्यांनी ६० हून अधिक इमारतींचे वास्तुरचना काम यशस्वीपणे पूर्ण केले होते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि गुणवत्तेमुळे ते क्षेत्रात अत्यंत यशस्वी ठरले होते. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा गंभीर आजार झाला होता. त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांना किडनी दान केली होती.

Web Title: Pune nashik highway manchar car and bus accident three people death crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Accident Case
  • crime news
  • Manchar

संबंधित बातम्या

Sri Lanka Crime : श्रीलंकेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 71 वर्षीय पुजाऱ्यासह 22 ‘ड्रग्स तस्कर’ भिक्षूंना बेड्या
1

Sri Lanka Crime : श्रीलंकेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 71 वर्षीय पुजाऱ्यासह 22 ‘ड्रग्स तस्कर’ भिक्षूंना बेड्या

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक
2

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?
3

तुळजापुरात रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने वार; नेमकं काय घडलं?

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत
4

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.