Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 01, 2026 | 04:27 PM
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • आयुक्तांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस
  • बेकायदेशीर वृक्षतोडीप्रकरणी महेश गारगोटे यांच्यावर आरोप
  • दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांना आयुक्तांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली असून, दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

सहायक प्राध्यापकाच्या अपमानप्रकरणी डॉ. वाबळेंना नोटीस

‘वायसीएम’ रुग्णालयातील एका सहायक प्राध्यापकाचा अपमान केल्याप्रकरणी डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपांचे गांभीर्य, सुरू असलेला पोलीस तपास आणि शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय ठरेल असे गैरवर्तन करून कर्तव्यात सचोटी न बाळगल्याचा ठपका ठेवत डॉ. वाबळे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसांत असमाधानकारक खुलासा आल्यास अथवा खुलासा सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

५२ पुरातन वृक्षांची बेकायदेशीर तोड; उद्यान अधीक्षक गारगोटेंवर ठपका

दुसऱ्या प्रकरणात, पिंपरीतील एका खाजगी जागेमधील हेरिटेज दर्जा असलेल्या ५२ पुरातन झाडांची बेकायदेशीर तोड केल्याचा आरोप मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. झाडांची संख्या आणि वय कागदोपत्री कमी दाखवून फेरफार केल्याचा ठपका, प्रचलित नियम, शासन निर्देश आणि प्रशासकीय मंजुरी डावलून वृक्षतोडीस प्रोत्साहन दिल्याचा आरोप. या गैरकारभारामुळे महापालिकेचे आर्थिक आणि महसुली नुकसान झाल्याची नोंद तक्रारीत. शहरातील वृक्ष संरक्षण, संगोपन आणि उद्यानांची देखभाल करण्याची जबाबदारी असतानाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी, ‘आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये?’ अशी विचारणा नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणेरी मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार! ‘या’ तारखेपासून सकाळी 6 वाजता पहिली फेरी; जाणून घ्या तिकीटदर

मुदतीत समाधानकारक खुलासा सादर न झाल्यास दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : खंडणीसाठी व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण; फरार गुंड तुषार हंबीर अखेर पोलिसांच्या ताब्यात

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे?

    Ans: वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे आणि मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • Que: महेश गारगोटे यांच्यावर कोणता आरोप करण्यात आला आहे?

    Ans: पिंपरीतील खासगी जागेवरील हेरिटेज दर्जाची ५२ पुरातन झाडे बेकायदेशीरपणे तोडल्याप्रकरणी त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे.

  • Que: दोन्ही अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्यासाठी किती मुदत देण्यात आली आहे?

    Ans: दोन्ही अधिकाऱ्यांना दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: The pimpri chinchwad municipal commissioner has issued a notice to two senior officials nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला
1

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
2

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…
3

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा
4

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.