Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांचा मोठा कारनामा; बनावट डिग्रीची मार्कलिस्ट तयार केल्याचा आरोप, गुन्हा दाखल

पुणे महानगर पालिकेमध्ये हे सध्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. त्यांनी 'सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीची 'एमबीए'च्या बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट तयार करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला सांगितल्याचे उघड झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 17, 2024 | 07:50 PM
pune Somnath Bunkar fake degree fraud

pune Somnath Bunkar fake degree fraud

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे महानगर पालिकेतून धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्तांचा मोठा कारनामा समोर आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीची ‘एमबीए’च्या बनावट डिग्रीचे मार्कलिस्ट तयार करून त्याची सेवा पुस्तिकेत नोंद करायला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी व लिपिकांनी साथ दिल्याच्या आरोपांवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणामध्ये पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त सोमनाथ हरिभाऊ बनकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपिक राजेंद्र घारे व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमनाथ बनकर हे सध्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आहेत. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते  सुधीर रामचंद्र आल्हाट (वय 54, रा. तानाजीवाडी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार पुणे महापालिका कार्यालय येथे 1 जानेवारी 2008 ते जानेवारी 2016 दरम्यान घडला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त असलेले सोमनाथ बनकर हे 2008 मध्ये महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलचे रेक्टर होते. त्यावेळी त्यांनी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटी येथून 2008 व 2009  या शैक्षणिक वर्षांमध्ये एमबीएची बनावट डिग्री प्राप्त केली. तसेच, स्वत:च्या सेवा पुस्तिकेत नोंद करुन घेतली. त्यात तत्कालिन शिक्षणाधिकारी सुधाकर तांबे आणि लिपीक राजेंद्र घारे यांनी संगणमताने साथ दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदार आल्हाट यांनी या सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीमध्ये माहिती अधिकारात अर्ज केला होता. 27 डिसेंबर 2016 रोजी सिक्कीम मणिपाल युनिर्व्हसिटीने सोमनाथ बनकर नावाच्या कोणत्याही विद्यार्थ्याने पदवी घेतली नसून ही पदवी बनावट असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत करत आहेत.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

पुण्यात निवडणुकीच्या तोंडावर ४० तडीपार गुंडांना पोलिसांनी पकडले

निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून गुंडाचा वापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पुण्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास ४० तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. त्यात पुण्यात ऐन निवडणुकीच्या काळात अन् प्रचाराच्या धामधुमीत हे तडीपार गुंड शहरात हजेरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य असल्याचे दिसते. राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोपी-प्रत्यारोप होत आहेत. हे सुरू असतानाच राजकीय पक्ष तसेच उमेदवार गुंडांचा वापर करत असल्याचाही आरोप होत आहे. दरम्यान निवडणूकीत शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून सतर्कता बाळगत काम केले जात आहे. त्यामध्ये बेकायदा हत्यारे बाळगणाऱ्या गुंडांसह तडीपार गुंडावर नजर ठेवली जात असून, त्यांना चाप लावण्यात येत आहे.

 

Web Title: Pune pmc deputy commissioner somnath bankar fake degree fraud case news in marathi crime

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 07:12 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
3

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
4

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.