Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका; 9 महिन्यांत 105 आरोपींना अटक

संयुक्त कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ९८.८६ ग्रॅम आणि जोधपूरमधून एक किलो ९१२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. नयानगर प्रकरणातही २७ आरोपींना मेफेड्रोनसह अटक करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 17, 2026 | 11:02 AM
अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांना पुणे पोलिसांचा दणका

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध राज्याच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) धडक मोहीम उघडली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत १०५ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल १३ कोटी ९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १२ कोटी ११ लाख रुपयांचे अमली पदार्थ, तर १ कोटी ८० लाख रुपयांच्या इतर ऐवजाचा समावेश आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी पत्रकार परिषदेला विशेष पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव आदी उपस्थित होते. टास्क फोर्सने राबविलेल्या मोहिमेत पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. काही प्रकरणांचे धागेदोरे इतर राज्यांसह परदेशापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. पुण्यातील बाणेर येथील प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर, नाशिकमधील गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास राजस्थानच्या जोधपूरपर्यंत पोहोचला.

Meerut Snakebite Murder Case : पत्नी आणि प्रियकराला फाशी; न्यायाधीशांनी सावित्री-यमराजांचा का केला उल्लेख?

संयुक्त कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत ९८.८६ ग्रॅम आणि जोधपूरमधून एक किलो ९१२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. नयानगर प्रकरणातही २७ आरोपींना मेफेड्रोनसह अटक करण्यात आली आहे. नागपुरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल ५८२ किलो गांजा जप्त करण्यात आला. तर नवी मुंबईतील एका प्रकरणाचा तपास करताना बंगळुरूमध्ये मेफेड्रोन तयार करणारी फॅक्टरी कार्यरत असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणांमधून अमली पदार्थांची निर्मिती, वाहतूक आणि वितरण करणार्‍या साखळीचा शोध घेण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.

जनजागृती आणि पोलिसांच्या प्रशिक्षणावर भर

अमली पदार्थांची विक्री आणि पुरवठा करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच व्यसनाधीन व्यक्तींचे पुनर्वसन आणि जनजागृतीवरही टास्क फोर्सने भर दिला आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, सीमावर्ती भागांत देखरेख आणि केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे.

टास्क फोर्सकडून नियोजनबद्ध कारवाई

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी टास्क फोर्सकडून नियोजनबद्ध कारवाई केली जात आहे. केवळ अमली पदार्थ जप्त करणे किंवा आरोपींना अटक करण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांचे मुख्य सूत्रधार, निर्मितीचे स्रोत आणि पुरवठा साखळीपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जात आहे.

– ज्योतिप्रिया सिंग, विशेष पोलीस महानिरीक्षक

Web Title: Pune police arrest drug traffickers nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Pune Police

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा
2

विद्यार्थ्यांवर नाही, माझ्यावर गुन्हे दाखल करा! रोहित पवार आक्रमक; फडणवीसांवरही साधला निशाणा

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
3

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
4

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.