पुणे: पुण्यातून एक बँक कर्मचाऱ्याचा धक्कदायक प्रकार समोर आलं आहे. दिवसा बँकेत नोकरी करणारा तरुण रात्री मात्र ऑनलाईन मटक्याचे आकडे घेण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे. खडक पोलिसांनी कारवाई करत बँक कर्मचाऱ्यासह आणखी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव राहुल दिलीपसिंग परदेशी (वय 42, रा. स्वामी समर्थ अपार्टमेंट, बेनकर वस्ती, धायरी गाव) असे आहे. राहुल परदेसी हा B.Com पदवीधर आहे. सध्या तो बँकेत नोकरी करतो. दिवसा बँकेतील कामकाज सांभाळून रात्री ऑनलाईन मटक्याचे आकडे घेत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्या सोबत मटका खेळणाऱ्या आणखी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कशी करण्यात आली कारवाई?
या प्रकरणी पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २५ सप्टेंबर रोजी पोलीस अंमलदार आशिष जाधव व इरफान नदाफ हे पोलीस ठाण्यात असताना, त्यांना माहिती मिळाली की निळू फुले जलतरण तलावाजवळ एक व्यक्ती मोबाईल फोनद्वारे मटक्याचे आकडे सांगून जुगाराचे बुकींग घेत आहे.ही माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचित करून तात्काळ पथक रवाना केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, तेथे एक व्यक्ती मोबाईलवर मटक्याचे आकडे घेताना आढळून आला. त्यावेळी राहुल परदेशी याला ताब्यात घेण्यात आले.
रोख व मुद्देमाल जप्त
पोलिसांनी झडती घेतली असता राहुलकडून 562 रुपये रोख, मोबाईल फोन, असा एकूण 3562 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात, त्याच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप चॅट्स तपासल्यानंतर त्याने 17 वेगवेगळ्या व्यक्तींना मटक्याचे आकडे पाठवून बुकींग घेतल्याचे निष्पन्न झाले.
बँक कर्मचाऱ्यांची कबुली
चौकशीदरम्यान राहुल परदेशी याने कबूल केले की, तो सुरज ज्ञानेश्वर गायकवाड याच्यासाठी काम करत होता. तो व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांना मटक्याचे आकडे पाठवत असे आणि त्याबदल्यात रोख रकमेसह विविध मनी ट्रान्सफर अॅप्सद्वारे पैसे स्वीकारत असे.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे
या प्रकरणात खडक पोलिसांनी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशाल शेडगे (रा. लोहियानगर), सुरज ज्ञानेश्वर गायकवाड (रा. खडकमाळ आळी), मुकेश सातपुते (रा. पानघंटी चौक), प्रतीक बनकर (रा. झगडेवाडी), विजयसिंग बाळारामसिंग परदेशी (मामा) (रा. घोरपडी पेठ), शिवा धनगर (रा. पदमावती), सुनिल वाघ (रा. सिंहगड रोड), बालाजी दत्तात्रय गट्डे (रा. सदाशिव पेठ), सचिन मधुकर सुपेकर (रा. पर्वती दर्शन), सचिन पालवे (रा. शिवतेजनगर, कोथरुड), विलास दिवाणे (रा. खडकमाळ आळी, राठी वाडा), रहीम शेख (अब्दुल रहिम हजारी शेख) (रा. एम जी रोड, कॅम्प), शुभम गोडसे, अन्ना शिंदे (रा. बिबवेवाडी), शुभम सुरेश कामदुले (रा. खडकमाळ आळी), अक्षय सुभाष तेलवडे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
Mumbai News: विक्रोळीतील धक्कादायक प्रकरण, मृत घोषित झालेली महिला सापडली जिवंत; काय नेमकं प्रकरण?