Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

मुंबईहून पुण्यात आलेल्या एकाकडून पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून २ ग्रॅम एमडी, मोबाइल, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2025 | 12:07 PM
बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : मुंबईहून पुण्यात आलेल्या एकाकडून पोलिसांनी मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ पकडला आहे. त्याच्याकडून २ ग्रॅम एमडी, मोबाइल, रोकड असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्यावेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची मााहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच, तसेच पाच हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मेफेड्राेनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने मेफेड्रोन कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

जैनला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत मेफेड्रोनची विक्री केल्याप्रकरणी एका कुंटणखाना मालकिणीसह तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. कुंटणखाना मालकीण व तिचा भाऊ हे वेश्यावस्तीत येणाऱ्या ग्राहकांना तसेच महिलांना मेफेड्रोन विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली होती. नंतर आता मुंबईहून आलेल्या एकाला पकडण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू; दोन लहान मुले जखमी

गांजा तस्कराला पोलिसांनी पाठलाग करून पकडले

गेल्या काही दिवसाखाली स्वारगेट बस स्थानकात पोलिसांनी एका गांजा तस्काराला पाठलाग करून थरारकरित्या बेड्या ठोकल्या. त्याच्यानंतर त्याचे दोन साथीदार देखील पोलिसांच्या हाती लागले असून, त्यांच्याकडून ६ किलो गांजा, एक इनोव्हा क्रिस्टा कार तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. वेळापुर, जि. सोलापूर), अल्ताफ ईलाई तांबोळी (वय २८) व विठ्ठल उर्फ दादा हरी शिवपाल (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संपतराव राऊत, उपनिरीक्षक सुर्यकांत सतपाळे, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सावंत, नवनाथ शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Pune police arrests man selling mephedrone in budhwar peth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
3

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
4

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.