Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फॉर्च्यूनर गाडीमधून गांजाची तस्करी! पुणे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

थेऊर भागात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉर्च्यूनरसारख्या महागड्या कारमधून होत असलेल्या गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 13, 2026 | 03:25 PM
फॉर्च्यूनर गाडीमधून गांजाची तस्करी! पुणे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

फॉर्च्यूनर गाडीमधून गांजाची तस्करी! पुणे पोलिसांनी आरोपीला सापळा रचून पकडले

Follow Us
Follow Us:
  • फॉर्च्यूनर गाडीमधून गांजाची तस्करी!
  • आरोपीला सापळा रचून पकडले
  • पुणे पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुणे जिल्ह्यातील थेऊर भागात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉर्च्यूनरसारख्या महागड्या कारमधून होत असलेल्या गांजा तस्करीचा प्रकार उघडकीस आणला आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, एका व्यक्तीला पकडून त्याच्याकडून ५३ किलो गांजा पकडला आहे. या कारवाईत ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

प्रीतम रविंद्र कुंजीर (वय ३२, रा. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस अंमलदार अमोल सरडे, निलेश जाधव, राहुल शिंदे, अक्षय शिर्के, आशा भिंगारे आणि लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश पैठणे, अंमलदार आण्णा माने यांनी केली.

पुणे शहरातून ड्रग्ज (अंमली पदार्थ) मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत होते. यादरम्यान, बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर गाडीतून गांजाचा मोठा साठा विक्रीसाठी थेऊर परिसरात आणणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेऊर परिसरात विविध ठिकाणी सापळा रचला. येथील धुमाळ मळा भागात ११ मार्च रोजी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास संशयित वाहन थांबवून तपासणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; सणसवाडीत तब्बल 1.79 कोटींचे मेफेड्रॉन जप्त

फॉर्च्यूनर गाडीसह अंमली पदार्थांचा साठा केला जप्त

त्यावेळी आरोपी प्रीतम कुंजीर याच्या ताब्यातून ५३ किलो १४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. गांजाची किंमत १० लाख ६० हजार २८० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, आरोपीकडील ३० लाख रुपये किमतीची फॉर्च्यूनर गाडी व १० हजार रुपये किमतीचा मोबाइल, असा एकूण ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Pune police has arrested an accused for smuggling ganja in a fortuner car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • crime news
  • Drugs News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.