Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“बाबा मी जात आहे…”, सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Delhi Crime : दिल्लीतील नांगलोई परिसरात एका विवाहित महिलेच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी तिने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2026 | 02:21 PM
"बाबा मी जात आहे...", सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

"बाबा मी जात आहे...", सासरच्या जाचाला कंटाळून २४ वर्षीय तरुणीने संपवले आयुष्य; मृत्यूपूर्वी व्हिडिओ केला शूट

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्येपूर्वी महिलेने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड करून गंभीर आरोप केले.
  • घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.
  • व्हिडिओतील दाव्यांमुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.
घरगुती हिंसाचाराची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असून दिल्लीच्या नांगलोई परिसरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आपले आयुष्य संपवले आणि आत्महत्येचे कारण तिने व्हिडिओत स्पष्ट केले आहे. मृत्यूपूर्वी तरुणीने आपल्या फोनच्या कॅमेरात व्हिडिओ शूट केला आणि आपल्या आई-वडिलांना सांगितले की, यापुढे ती कुणालाही त्रास देणार नाही. आपल्या मुलीचे, भावाचे आणि बहिणीचे नाव घेऊन ती आणखीनच भावूक झाली. व्हिडिओ शूट केल्यानंतर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेचा तपास सुरु आहे.

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव टीना असून सुमारे अडीच वर्षांपूर्वी तिचा विवाह दिल्लाच्या नांगलोई परिसरातील एका तरुणासोबत झाला होता. टीनाचा पती प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत होता. दोघांनीही दीड वर्षांची एक मुलगी देखील आहे. पती आणि सासरच्यांकडून होणाऱ्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचा आरोप टीनाने व्हिडिओत केला. मुख्य म्हणजे व्हिडिओत तिने असेही म्हटले की, तिच्या मुलीला कुणाच्याही हवाली करु नये, अगदी पतीच्याही नाही.

पोलिस तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिस मंगळवारी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महिलेचा मृत्यू तिच्या लग्नाच्या सात वर्षांच्या आत झाल्याने, एसडीएम आणि तहसीलदारांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि कायद्यानुसार तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडितेच्या आईने सासरच्यांवर हुंड्याचा आरोप केला नाही परंतु टीनाचा पती दारु पिऊन तिला मारहाण करायचा असे सांगितले. पोलिस सर्व पुरावे, व्हिडिओची पडताळणी करत असून महिलेने आत्महत्या का केली, यामागील परिस्थिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘पापा मैं जा रही हूं…’ दिल्ली में ससुरालवालों से दुखी 24 साल की टीना ने वीडियो बनाकर लगाई फांसी#Delhi pic.twitter.com/R7yIMfJPn1 — NDTV India (@ndtvindia) June 25, 2026

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब

जादू-टोनाचा आरोप

टीनाने व्हिडिओत सांगितले की, “बाबा माझी मुलगी मोना आता तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जसे मला सांभाळले तसेच तिलाही सांभाळा. मी तुम्हाला खूप त्रास दिला पण आता कोणताच त्रास देणार नाही. आई माझ्यासाठी आता पुन्हा कुणाशाही भांडू नकोस. चुकी माझी आहे, लग्न मी केले होते. यांच्या घरचे अजिबात चांगले नाहीत. जे आपल्या मुलाचे नाही झाले ते माझे आणि माझ्या मुलीचे कसे होणार. आई मी सासूला, दीराला आणि कुणालाही मारलं नाही. हे माझ्यावर खोटा आळ घेत आहेत मी कुणावरही जादू-टोना केला नाही. मला तर फक्त माझे एक लहान कुटुंब बनवायचे होते. पण आता नाही बनवू शकत, माझे नशीब खराब आहे. आई माझी आठवण काढू नकोस. मी तुला त्रास देणार नाही. मी तुझी चांगली मुलगी आहे, मी कधीच तुझ्याविषयी वाईट विचार केला नाही. बाबांशी भांडू नकोस. गुनगुन, मोनाला तू सांभाळशील. तिची दुसरी आई आहेस तू, माझ्या मुलीला तू सांभाळून ठेव”.

Web Title: Delhi woman suicide video alleges domestic harassment before death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • crime news
  • delhi case
  • Suicide case

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.