Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गजा मारणे टोळीतील तिघांना पोलीस कोठडी; मिरवणूकीत तरुणाला मारहाण करणं भोवलं

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मंडळाने काढलेल्या मिरवणूकीत निरपराध तरुणाला मारहाण प्रकरणात तिघांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2025 | 06:54 PM
गजा मारणे टोळीतील तिघांना पोलीस कोठडी; मिरवणूकीत तरुणाला मारहाण करणं भोवलं

गजा मारणे टोळीतील तिघांना पोलीस कोठडी; मिरवणूकीत तरुणाला मारहाण करणं भोवलं

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मंडळाने काढलेल्या मिरवणूकीत निरपराध तरुणाला मारहाण प्रकरणात तिघांना न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, माध्यमांत बातम्या अन् केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी धावपळ करत खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम लावले. दुसरीकडे गुंडाची खैर नाही असे पोलीस आयुक्त सांगत असताना याप्रकरणाची गुप्तता पाळण्यात आल्याने नेमके प्रकरण इतक्या गुप्ततेने का हातळले गेले असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू (वय ३५,रा. शिंदे चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१, रा. शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरुड), अमोल विनायक तापकीर (वय ३५, रा. लालाबहादूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरुड) अशी अटक व पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार पसार आहे. हा प्रकार कोथरुडमधील भेलकेनगर चौकात १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला होता. याबाबत देवेंद्र जोग याने कोथरूड पोलिसांत तक्रार दिली आहे.

जोग हा आयटी कंपनीत नोकरीला आहे. तो घटनेच्या दिवशी दुचाकीवरुन जात होता. तेव्हा गजानन मारणे मंडळाने शिवजयंतीची मिरवणूक सुरू होती. मिरवणूकीच्या समोरून तो दुचाकीने निघाला होता. त्याने हॉर्न वाजविल्यानंतर चौघांनी त्याला अडविले. त्यांना मिरवणूकीत गाडी घातल्याचा राग आला. त्यांनी काय रे गाडी हळु चालविता येत नाही़ धक्का मारतो का, असे म्हणत वाद घालण्यास सुरूवात केली. तरीही जोग म्हणाला दादा मी तुम्हाला धक्का दिला नाही. परंतु, इतरांनी त्याला थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. तोंडावर व नाकावर मारहाण झाल्याने त्याच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे दुचाकीवरुन खाली पडल्याने खरचटले. त्यानंतर ३ ते ४ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

एकाने कमरेचा पट्टा काढून मारहाण केली. ऐन गर्दीत मारहाण झाल्याने मोठी गर्दी झाली. नंतर मारहाण करणारे गुजरात कॉलनीच्या दिशेने पळाले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली. कुख्यात गजा मारणेच्या टोळीतील मुलांनी मारहाण केलेली असताना हे प्रकरण किरकोळ स्वरूपात घेण्यात आले. मात्र, माध्यमात तसेच केंद्रीय मंत्र्यांनी जखमी जोगशी विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी यात गांर्भियाने दखल घेतली. दुसऱ्या दिवशी रात्री या आरोपींना अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

जाणीवपूर्वक जीवे मारण्याच प्रयत्नाचा गुन्हा- अॅड. विजयसिंह ठोंबरे

तीन आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवाद केला. सुरवातीला किरकोळ मारहानीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांनी जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. अश्या प्रकारे खोटे गुन्हे दखल होणार असतील तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे ठोंबरे यांनी सांगितले. दरम्यान दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानतंर न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली.

चौघेही सराईत गुन्हेगार..!

पसार झालेला आरोपी बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हा फरार आहे. बाब्या पवारवर खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे कोथरुड, भारती विद्यापीठ, पौड, अलंकार पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४ गुन्ह्यामध्ये त्याची निर्दोष सुटका झाली आहे. अमोल तापकीर याच्यावर कोथरुड, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याच्या तयारीत, मारामारी असे ६ गुन्हे दाखल आहेत. त्यातील एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. किरण पडवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म अ‍ॅक्ट खाली ४ गुन्हे दाखल आहेत. ओम धर्मजिज्ञासू याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण करुन खंडणी मागणे, मारामारी असे चार गुन्हे दाखल असून, त्यातील एका गुन्ह्यात निर्दोष सुटका झाली आहे.

Web Title: Pune police has arrested three members of gaja marne gang nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Arrested
  • crime news
  • Gaja Marne
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी
3

Crime News: पत्नीला हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव; तपासातच उलगडली ३ खुनांची थरारक कहाणी

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले
4

वनपुरी जमीन घोटाळ्यात नवीन ट्विस्ट! बोगस दस्तसाठी महिलांचा वापर; गुन्ह्याच्या नवीन फंडाने पोलिसही चक्रावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.