Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 84 लाखांचे अमली पदार्थ जप्त

पुणे शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 25, 2025 | 12:41 PM
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 84 लाखांचे अमली पदार्थ जप्त

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 84 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधील ही मोठी कारवाई मानली जात आहे.

पहिली कारवाई कोरेगाव पार्क येथे करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी प्रणव नवीन रामनानी (19, रा. बंडगार्डन) आणि गौरव मनोज दोडेजा (19, रा. कोरेगावपार्क) याना पकडले. त्यांच्या ताब्यातून 67 लाख 8 हजारांचा 2 ग्रॅम 78 मिली ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. तर 136 ग्रॅम 64 मिली गॅ्रम ओजीकुश गांजा जप्त करण्यात आला. यावेळी दोन महागड्या कारही जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगावपार्क परिसरात अमली पदार्थ विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिग करत होते. त्यावेळी पोलीस अमंलदार संदीप शिर्के यांना येथील क्लोअर गार्डन सोसायटी परिसरात प्रणव आणि गौरव यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी 67 लाख 8 हजारांचा 2 ग्रॅम 78 मिली ग्रॅम कोकेन जप्त केले. तर तसेच 136 ग्रॅम 64 मिली गॅ्रम ओजीकुश गांजा जप्त करण्यात आला. यावेळी दोन महागड्या कारही जप्त करण्यात आल्या.

तर दुसर्‍या कारवाईत अमंली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड त्यांच्या अमंलदारांसह लोणी काळभोर परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अमंलदार योगेश मांढरे यांना एक राजस्थानी व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी पथकाने लोणकर वस्ती येथील ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून भरतकुमार दानाजी राजपुरोहीत (35) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघेही रा. जालोर, राजस्थान) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून तब्बल 40 किलो 390 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे व त्यांच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आता सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी काढला तोडगा

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Pune police has seized drugs worth 84 lakhs nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त
1

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश स्थिती; चापडगाव परिसरात खरीप पिके उद्ध्वस्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
2

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
3

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
4

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.