Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

बेकायदा पिस्तूलप्रकरणात परराज्यात ऐतिहासिक कारवाई केल्यानंतर देखील पुण्यात पिस्तूलांची बेकायदा विक्री तसेच त्याचा वापर होत असल्याचे दिसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2026 | 12:44 PM
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई; पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
  • सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या
  • चार पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना उघडकीस येत असतात. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बेकायदा पिस्तूलप्रकरणात परराज्यात ऐतिहासिक कारवाई केल्यानंतर देखील पुण्यात पिस्तूलांची बेकायदा विक्री तसेच त्याचा वापर होत असल्याचे दिसत असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकत मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्याच्याकडून चार पिस्तूल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

 

एफसी रोडवरील ज्ञानेश्वर पादूका चौकाच्या परिसरात करण्यात आली आहे. पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २४, रा. जुनी सांगवी) व अभिषेक राजु टेंकल (वय २३, रा. शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारावई गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव, पोलिस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, प्रशांत शिंदे, दिलीप गोरे तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरात बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहिम सुरु करुन मोठी कारवाई केली आहे. एका कारवाईनंतर मध्यप्रदेशात जाऊन पोलिसांनी कारखाने उद्धवस्थ केले आहेत. तसेच, पुण्यातील एजंट यांच्यावरही नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलिस अंमलदार गस्त घालत असताना पथकाला माहिती मिळाली की, रोहित धर्माधिकारी हा ज्ञानेश्वर पादूका चौकात आलेला असून, त्याच्याकडे शस्त्र आहेत. त्यानूसार, पथकाने त्याला व त्याचा मित्र अभिषेक यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

आरोपी पोलिसाच्यां रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापुर्वीचेही गुन्हे आहेत. दरम्यान, ते पिस्तूल कोणाला विक्री करण्यासाठी आणले होते, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले

उमरटीतूनच पिस्तूल पुण्यात

पुणे पोलिसांनी गेल्या वर्षात (नोव्हेंबर २०२५) उमरटी गावात जाऊन मोठी कारवाई केली होती. नंतर पिस्तूलांचा पुण्यात होणारा ओघ कमी होईल, असा दावा करण्यात आला होता. पण, नंतर काही दिवसांतच पुन्हा ओघ सुरू झाल्याचे यावरून समोर आले आहे. या आरोपींनी उमरटीमधूनच पिस्तूले आणले असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यांना हे पिस्तूल तेथून कोणी दिले, तेच एजंट अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत का याचा तपास सुरू आहे.

Web Title: Pune police has taken major action by arresting criminals carrying pistols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
1

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
2

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र
3

Turkey LGBTQ Crackdown :डझनभर जणांना अटक ;तुर्कीमध्ये LGBTQ +कार्यकर्त्यांवर धाडसत्र

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
4

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.