धक्कादायक ! प्लॉट घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सातत्याने मारहाण; मुलांसह घराबाहेरही काढले
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. त्यात माहेरहून प्लॉट खरेदीसाठी दहा लाख रुपये आण, असा तगादा लावत विवाहितेला वेळोवेळी मारहाण करुन तिचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी विवाहितेने हर्सल पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यात विवाहितेचा वेळोवेळी छळ केला जात असल्याचे नमूद केले. तसेच दुसरे लग्न करतो, तुला नांदवत नाही, असे म्हणत विवाहितेला दोन मुलांसह घराबाहेर हाकलून लावले. प्रकरणात पतीसह सासरच्या आठ जणांवर विरोधात हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर १९ नोव्हेंबर २०१६ पासून ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत हिनानगर, चिकलठाणा येथे आपला छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पती अलिम वाहब सय्यद, सासू हनिफा वाहब सय्यद, सासरे वाहब इस्माईल सय्यद, दीर अनिस वाहब सय्यद व युनुस वाहब सय्यद, जाऊ सिमा अनिस सय्यद, तसेच नंदई शहानुर मोईद्दीन शेख व ननंद आयशा शहानुर शेख यांनी संगनमत करुन माहेरहून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. पैसे आणले नाहीत म्हणून शिवीगाळ, मारहाण करत पीडितेचा छळ करण्यात आला. पतीने दुसरे लग्न करतो, तुला नांदवत नाही, अशी धमकी दिली आहे.
नांदवत नाही अशी धमकीही दिली
ईद-ए-मिलाद सणाच्या दिवशी तू आमच्या काही कामाची नाहीस, असे म्हणत पतीने दुसरे लग्न करतो, तुला नांदवत नाही अशी धमकी देऊन पीडिता व दोन मुलांसह घराबाहेर हाकलून लावले. आई-वडिलांना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास, तुम्हाला जिवे मारुन टाकू, अशी धमकी दिल्याचे देखील फिर्यादीत नमूद केले आहे. हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापानेच केला दिव्यांग मुलीवर अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, दक्षिण मुंबईतून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय दिव्यांग तरुणीसोबत तिच्या ५० वर्षीय बापाने घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कफ परेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकरणातील पीडिता ही ती विकलांग असून, तिला बोलता किंवा ऐकता येत नाही. अत्याचारानंतर ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं उघडकीस आलं.
हेदेखील वाचा : Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा






