Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्मार्ट’ चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तपासातून धक्कादायक प्रकार उघड

पुण्यासारख्या शहरात चोरटे देखील 'स्मार्ट' झाल्याचे दिसत असून, एका चोरट्यांने महागड्या गाड्यांची चोरी करून त्या विकल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2025 | 12:30 AM
‘स्मार्ट’ चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तपासातून धक्कादायक प्रकार उघड
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यासारख्या शहरात चोरटे देखील ‘स्मार्ट’ झाल्याचे दिसत असून, एका चोरट्यांने महागड्या गाड्यांची चोरी करून त्या गाड्या विकण्यासाठी एक नवीन फंडा शोधून काढला. दुचाकी चोरुन त्याने फेसबूकवरील ‘मार्केट प्लेस’ या ‘ऑनलाईन पद्धतीने या दुचाकींच्या विक्रीची जाहिरात देऊन विक्री केल्याचे समोर आले आहे. त्याच्या या करामतीने पोलिसही हैराण झाले होते.

महादेव शिवाजी गरड (वय २६, रा. मांजरी बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या या स्मार्ट चोरट्याचे नाव आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पतंगे व त्यांच्या पथकाने केली आहे.

पुणे शहरात वाहन चोरीची प्रचंड संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून वाहन चोरणाऱ्या सराईतांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यादरम्यान, युनिट पाचच्या पथकाने गुप्त माहितीवरून महादेव गरड याला पकडले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्याच्यावर संशय बळावल्याने त्याच्याकडे सखोल तपास केला. तेव्हा त्याने वेगवेग‌ळ्या भागातून तब्बल आणखी १२ दुचाकी चोरल्याचे समोर आले. त्याबाबत माहिती घेतल्यानंतर त्याने या दुचाकी ऑनलाईन विक्री देखील केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

या पोलिस ठाण्यातील गुन्हे उघड

हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६, काळेपडळ पोलिस ठाण्याकडील ३, चिखली पोलिस ठाण्याकडील २ तसेच सांगवी पोलिस ठाण्याकडील ३ असे १४ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून ८ लाख ४० हजार रुपयांच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : रोहित पवारांना मोठा धक्का! ED कडून पुरवणी आरोपपत्र दाखल, नेमकं प्रकरण काय?

फेसबूकवरून दुचाकींची विक्री

फेसबुकवरील मार्केट प्लेस या अॅपच्या माध्यमातून त्याने चोरलेल्या दुचाकींची विक्री जाहिरात टाकून त्या विक्री केल्याचे समोर आले आहे. त्याने विक्री करताना ग्राहकांना या दुचाकी हप्ते तटल्याने फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या आहेत. यामुळे त्या विक्री करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडून या दुचाकी घेतल्याचे सांगण्यात आले.

पुण्यात भरदिवसा घरफोड्या

घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी कोंढवा आणि आंबेगाव पठार भागात भरदिवसा ३ फ्लॅट फोडून सुमारे ३ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. चोरट्यांनी बंद घरांची टेहळणी करून ही चोरी केल्याचा संशय आहे. दुपारी झालेल्या या घरफोड्यांमुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याप्रकरणी कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा तपास सुरू आहे.

Web Title: Pune police have arrested a two wheeler thief and taken action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.