Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 19, 2026 | 12:30 AM
खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील 'या' परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. कात्रज परिसरात ही कारवाई करण्यात आली असून, त्याला पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सोहम ऊर्फ सोन्या मनोहर थोरात (वय २१, रा. वडगाव बुद्रुक, जाधवनगर, भैरवनाथ मंदिराजवळ, सिंहगड रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७१/२०२६ दाखल असून भारतीय न्याय संहितेतील कलम १०९, १८९(२), १९१(३), ३५१(२), ३५२, ३(५), आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सोहम थोरात याचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच कुंदन शिंदे, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, विजय पवार आदींच्या पथकाने केली आहे.

गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार कुंदन शिंदे, विजय पवार आणि उज्वल मोकाशी यांना सोहम थोरात हा कात्रज चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती युनिट दोनचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांना देण्यात आली. त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव-पत्ता विचारला असता त्याने सोहम ऊर्फ सोन्या मनोहर थोरात असे सांगितले. चौकशीत तो सहकारनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्याला सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : नाशिक हादरलं ! नवीन प्रियकराच्या मदतीने पार्टनरचा काढला काटा; मृतदेह कसारा घाटात नेला अन्…

Web Title: Pune police have arrested an absconding accused wanted for attempted murder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
1

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.