Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

नो-पार्किंगमध्ये लावलेले वाहन उचलल्यानंतर वाहनचालकाला ‘दंडा’चा धाक दाखवीत त्याच्याकडून ३ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने टोइंग व्हॅनवरील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 12, 2026 | 12:30 AM
कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट, टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या; पुणे पोलिसांची कारवाई

Follow Us
Follow Us:
  • कार सोडण्यासाठी ३ हजारांची लूट
  • टोइंग व्हॅनवरील तिघांना ठोकल्या बेड्या
  • पुणे पोलिसांची कारवाई
पुणे : नो-पार्किंगमध्ये लावलेले वाहन उचलल्यानंतर वाहनचालकाला ‘दंडा’चा धाक दाखवीत त्याच्याकडून ३ हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये उघडकीस आला आहे. टोइंग व्हॅनवरील चालकासह दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कार सोडण्यासाठी १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशी भीती घातली आणि त्यातून तीन हजार रुपये उकळले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने टोइंग व्हॅनवरील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आकाश नवनीत सावंत, समीर अतिक अन्सारी आणि शेख शौकत अतिक अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही शहर वाहतूक पोलिसांच्या टोइंग व्हॅनवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करीत होते. याबाबत कोरेगाव पार्क येथील ४६ वर्षीय व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २० जून रोजी फिर्यादी यांनी त्यांची कार कोरेगाव पार्कमधील नो-पार्किंगमध्ये उभी केली होती. टोइंग व्हॅनवरील चालकासह दोन कर्मचाऱ्यांनी कार उचलून वाहतूक विभागाच्या कार्यालयात नेली. कार सोडवण्यासाठी फिर्यादी तेथे गेले असता, त्यांच्या वाहनाचे दिव-दमन येथील आरटीओ पासिंग असल्याचे तसेच महाराष्ट्रात त्याची नोंदणी नसल्याचे आणि पीयूसीची मुदत संपल्याचे सांगून कायदेशीर कारवाईची धमकी देण्यात आली. या कारवाईचा धाक दाखवत आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांचा दंड मागितला.

भिलारे यांनी रीतसर पावतीची मागणी केली. त्यानंतर आरोपींनी तडजोडीचा सूर लावत कार सोडण्यासाठी तीन हजार रुपये मागितले. भिलारे यांनी पैसे दिल्यानंतर पावती मागितली असता, ‘नंतर येऊन पावती घेऊन जा’ असे सांगून त्यांची बोळवण करण्यात आली. तीन हजार रुपये दिल्यानंतरही पावती न मिळाल्याने तक्रारदार गेल्या दोन महिन्यांपासून पावतीसाठी पाठपुरावा करीत होते. मात्र, टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक वेळी टाळाटाळ करण्यात आली. अखेर संशय बळावल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने तपास हाती घेतला आणि तिन्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली. खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

हे सुद्धा वाचा : आईवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; चंदननगरमध्ये मित्रानेच केली मित्राची हत्या

Web Title: Pune police have arrested three contract workers from a towing van

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

बुलडाणा अर्बनच्या माजी सीईओ व विभाग व्यवस्थापिकांविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन
2

४८ दिवसांत तब्बल २१ किलो वजन घटलं! उच्च न्यायालय हादरले; ५९ वर्षीय कैद्याला अखेर वैद्यकीय जामीन

१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
3

१०० हून अधिक वाहनचोरीचे गुन्हे; दोन वर्षांपासून फरार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं
4

SIMI म्हणजे नेमकं काय? दहशतवादी वडिलांना भेटण्यासाठी बनावट पासपोर्ट, सौदी प्रवास; मुंब्र्यातून एका मुलीला ATSने पकडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.