Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्याच्या मेट्रो स्थानकातील आंदोलनाचा सूत्रधार कोण? पोलिस घेणार शोध; ‘या’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2025 | 09:48 PM
Pune News: पुण्याच्या मेट्रो स्थानकातील आंदोलनाचा सूत्रधार कोण? पोलिस घेणार शोध; 'या' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

Pune News: पुण्याच्या मेट्रो स्थानकातील आंदोलनाचा सूत्रधार कोण? पोलिस घेणार शोध; 'या' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: मोफत शिक्षण, नोकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला. पुणे मेट्रोच्या पुणे महापालिका स्थानकाजवळच्या रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी रुळासह वायरीचे नुकसान केले आहे. मेट्रोसारख्या संवेदनशील ठिकाणीच आंदोलन करण्यामागे आंदोलकांचा घातपाताचा हेतू होता का, त्यांनी मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी रविवारी (ता. ९) दुपारी दोन तास पुणे महानगरपालिका मेट्रो स्थानकाच्या रुळावर उतरून आंदोलन केले. या वेळी आंदोलकांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. या झटापटीत शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्यासह पाच पोलिस कर्मचारी आणि एक महिला जखमी झाल्या. त्यानंतर सर्व आंदोलकांवर खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे, दंगल आणि मेट्रो रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलकांना सोमवारी (ता.१०) न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Pune Police : आंदोलक थेट वर्दीशी भिडले: संदीप सिंग गिल यांच्यावर पडले पेट्रोल, त्यानंतर पोलिसांनी असे काही केले…

कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा कोणताही आदेश नसताना आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालयासारख्या शासकीय कार्यालयांऐवजी मेट्रोसारखे संवेदनशील ठिकाणच का निवडले, आरोपी वारंवार माध्यमांना बोलवा, असे म्हणत होते.  त्यामागे त्यांचा कोणता उद्देश होता. त्यांनी गुन्ह्याचा कट कोठे रचला, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील श्रीधर जावळे आणि तपास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केली. आंदोलक विरोधी पक्षातर्फे समाजहिताचे आंदोलन करत होते. मेट्रो स्थानकावर आंदोलकांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यांच्याकडे पेट्रोल होते, ही पोलिसांनी रंगविलेली कहाणी आहे. यातून मेट्रोच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो, असा युक्तिवाद आरोपींचे वकील ॲड. आदित्य झाड आणि ॲड. सिद्धार्थ राठोड यांनी केला.
या आरोपींना पोलीस कोठडी
नरेंद्र ज्ञानेश्वर पावटेकर (वय २५), ज्ञानेश्वर गणपतराव पावटेकर (वय ६२, दोघे रा. गणेश पेठ), अतुल सुदाम गायकवाड (वय ४५, रा. लोणीकाळभोर), भरतगिर सोमवारगिर गिरी (वय ३५, रा. डांगे चौक), अजिंक्य संग्राम कदम (वय २१, रा. धनकवडी), गणेश अशोक जवंजाळ (वय ४६, रा. कसबा पेठ), प्रियांका कुणाल धंडुके (वय २७, रा. रविवार पेठ), सुकन्या राजेंद्र जोरकर (वय २९, रा. सोमवार पेठ), कल्पना महेंद्र परदेशी (वय ४६, रा. गणेश पेठ).

Web Title: Pune police search mastermind of metro station protest court give custody politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार
1

Gautami Patil: तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीला अटक होणार? ‘या’ प्रकरणात अडचणी वाढणार

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
2

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं
3

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन
4

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.