पुण्यात संदीप सिंह गिल यांच्यावर आंदोलकांकडून पेट्रोल अंगावर पडल्याने ते आक्रमक झाल्याचे दिसून आले (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : शहरातील विविध भागांमध्ये दररोज आंदोलन केली जात आहेत. सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशी आंदोलन सुरु असताना पुण्याती एका आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या मनपा मेट्रो स्टेशनमध्ये आंदोलन केले. तरुणाईला नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याबाबत हे आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलकांच्या आंदोलनामध्ये पोलिसांवर पेट्रोल पडल्यामुळे पोलिसांनी देखील त्यांच्या वर्दीचा दम दाखवला.
शरद पवार गटाने तरुणांना नोकऱ्या देण्याची मागणी मेट्रो स्टेशनपासून ट्रॅकवर निदर्शने केली. यावेळी पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत हे आंदोलकांना खाली आणण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आक्रमक झालेल्या आंदोलकांमुळे मेट्रो सेवा २ तास ठप्प राहिली. तसेच आक्रमक आंदोलकांकडून पोलिसांवर देखील पेट्रोल पडले. यामुळे पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत आंदोलकांना बाहेर काढले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादीच्या आंदोलनात राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नरेंद्र पावटेकर आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील त्यांचे काही कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही निदर्शकांमध्ये सामील झाल्या. दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांनी तिकीट काढली आणि मेट्रो स्टेशनवर दाखल झाले. तिथून ते सरळ ट्रॅक ओलांडून मेट्रो पुलावर गेले आणि मोठ्याने घोषणा देऊ लागले. मेट्रोचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ गाड्या थांबवल्या. मेट्रो सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांना समजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.
आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु फालतू स्टंट आणि हुल्लडबाजी करत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल फेकणे,वर्दीला हात घालणे, शिवीगाळ करणे हा गंभीर गुन्हा , याचे समर्थन नाहीच
I support DCP Sandeep singh Gill and his team@Dev_Fadnavis@PawarSpeaks@CPPuneCity pic.twitter.com/ydTKHUo0RB — Archana More-Patil (@Archana_Mirror) March 9, 2025
आंदोलनकर्त्यांवर गुन्हा नोंद
मेट्रो स्टेशनवर आंदोलन करणाऱ्या जवळपास १० ते १५ जणांवर पोलिसांनी रात्री उशिरी गुन्हा नोंदवला आहे. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरकारी कामात अडथळानिर्माण करणे, मेट्रो कायदा तसेच बेकायदा आंदोलनसह इतर कलमानुसार हा गुन्हा नोंदवला गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पेट्रोल मुद्दाम टाकले नाही
आंदोलकांशी चर्चा अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटवण्यासाठी प्रयत्न केला. त्याचवेळी नरेंद्र पावटेकर यांना पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत समजाऊन सांगताना स्वतःच्या अंगावर पेट्रोल फेकले. त्यांनी पेट्रोलची बॉटल हवेत धरून ते टाकण्यास सुरूवात केली. त्यामुळे पेट्रोल पोलीस अधिकाऱ्यांवर पडले. आंदोलक कर्त्यांनी मुद्दाम पेट्रोल टाकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उन्हाचा चटका होता. उष्णतेच्या तीव्रतेमुळे किंवा मेट्रोच्या ओव्हरहेड वायर मुळे पेट्रोलला आग लागली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आक्रमक झाले. नंतर त्यांनी त्याला मेट्रो स्टेशनबाहेर काढले व पोलीस ठाण्यात नेले.