Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

सोशल मीडियावर रील्समुळे प्रसिद्ध झालेल्या रीलस्टारचा पुण्यात कथित गुन्हेगारी कारनामा समोर आला आहे. निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्यानंतर दहा जणांसह त्यांच्या घरात घुसून मारहाण व तोडफोड केल्याप्रकरणी दिव्या शिंदेला अटक करण्यात आली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 28, 2026 | 10:05 AM
Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

Pune Crime: पुण्यात बिग बॉस फेम रीलस्टारला अटक; डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, ५ लाखांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • रीलस्टार दिव्या शिंदेवर वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप
  • ५ लाखांची मागणी; दहा जणांसह डॉक्टरांच्या घरात घुसून तोडफोड
  • दिव्या शिंदेला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
 

पुणे : सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध रीलस्टार दिव्या सुनील शिंदे हिच्यावर निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून तोडफोड आणि मारहाण केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कारवाई केली आहे. डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने दहा जणांना सोबत घेऊन त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात डॉ. गायकवाड जखमी झाले असून, न्यायालयाने दिव्या शिंदे हिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: Dhule Crime: जुन्या वादातून दोन गटांत धुमश्चक्री; धारदार शस्त्रांनी हाणामारी, गोळीबाराने नागरिकांमध्ये दहशत

कार्यक्रमानंतर पाच लाखांची मागणी

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड हे ‘करुणादीप’ संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेच्या वतीने २ आणि ३ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात रीलस्टार दिव्या शिंदे सहभागी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर दिव्या शिंदे हिने डॉ. गायकवाड यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, डॉक्टरांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दहा जणांना सोबत घेऊन घर गाठले

पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने दिव्या शिंदे हिने तब्बल दहा जणांना सोबत घेऊन डॉ. गायकवाड यांच्या घरी गेल्याचा आरोप आहे. यावेळी घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. तसेच डॉ. गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले. घटनेनंतर डॉ. गायकवाड यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार दिव्या शिंदे आणि तिच्या दहा साथीदारांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिव्या शिंदेला अटक करून न्यायालयात हजर केले.

हेही वाचा: ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका

फरार आरोपींचा शोध सुरू

न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने डॉ. गायकवाड गंभीर जखमी असल्याचे नमूद केले. तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दहा आरोपींचा शोध घेणे, त्यांच्याकडून घटनेबाबत माहिती मिळवणे आणि प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. त्यानंतर न्यायालयाने दिव्या शिंदे हिला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच पाच लाख रुपयांच्या मागणीमागील नेमके कारण काय होते, याचा तपास काळेपडळ पोलीस करत आहेत. फरार असलेल्या अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Web Title: Pune reel star divya shinde arrest doctor assault extortion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • Doctors News
  • Extortion Case
  • pune crime case

संबंधित बातम्या

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
1

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा
2

Pune Crime: अल्पवयीनांना बोनेटला बांधल्याचा आरोप; मानवाधिकार आयोगाच्या दणक्यानंतर ११ पोलिसांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.