Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 23 गुन्ह्यांचा लावला छडा; तब्बल…

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यात जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 27, 2026 | 12:30 AM
लग्न मंडपावर फेकला चक्क पेट्रोल बॉम्ब

लग्न मंडपावर फेकला चक्क पेट्रोल बॉम्ब

Follow Us
Follow Us:

पारगाव शिंगवे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यात जबरी चोरी, चेन स्नॅचिंग व घरफोडी करणाऱ्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण २३ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पोलिसांनी आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोंदेवाडी फाटा परिसरातून हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५, रा. मंचर, ता. आंबेगाव) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५, रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना अटक केली. तसेच मावळ तालुक्यातील कामशेत परिसरातून पियुष बिरम नानावत (रा. सांगेशी, ता. मावळ) याला ताब्यात घेण्यात आले. याशिवाय एका विधीसंघर्षित बालकाला देखील ताब्यात घेतले आहे.

पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांची माहिती आणि गुप्त खबऱ्यांच्या मदतीने तपास करून ही कारवाई यशस्वी केली आहे. संबंधित आरोपींवर यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात शंकरराव पाटील, सचिन वांगडे, सुभाष चव्हाण, सचिन कांडगे यांचा सहभाग होता. या कारवाईत महादेव शेलार, राहुल गावडे, दत्ताजी मोहिते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाऊसाहेब लोकरे, अभिजित सावंत यांनीही तपासात सक्रिय सहभाग घेतला.

चोरट्यांकडून विविध ठिकाणी चौरी

तपासादरम्यान आरोपींनी पारगाव कारखाना, घोडेगाव, नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच उरुळी कांचन, दौंड, लोणावळा, वडगाव मावळ, राजगड, बारामती, भोर, खेड, शिरूर, सासवड, वेल्हा, यवत या भागांमध्ये चोरी, घरफोडी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या कारवाईत सुमारे ३२ तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकली आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चोरीच्या घटनांना आळा बसणार

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पथकाच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी झाली आहे. त्यामुळे पुणे ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण भागातील वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Pune rural police has taken major action by solving many crimes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?
1

फुरसुंगी भागात मजुरावर तीक्ष्ण शस्त्राने वार, दोघांना अटक; नेमकं काय घडलं?

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण
2

तुझी इन्स्टा आयडी दे, मला तुझ्यासोबत…; अल्पवयीन तरुणीला भर रस्त्यात मारहाण

किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकूने वार, बाणेरमधील घटनेनं मोठी खळबळ; आता पोलिसांनी…
3

किरकोळ वादातून दुचाकीस्वारावर चाकूने वार, बाणेरमधील घटनेनं मोठी खळबळ; आता पोलिसांनी…

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…
4

पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ, बसप्रवासात महिलांच्या दागिन्यांवर मारला डल्ला; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.